बीड: केज-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात (Beed Accident) झालाय. या अपघातात तब्बल 6 जणांचा (Beed Accident death) जागीच मृत्यू झालाय. ऍपेरिक्षा आणि इनोव्हाची (Innova) समोरसासमोर धडक झाली आहे. या अपघातात दोन गंभीर झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या जखमींवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. काही तासांपूर्वीचीच नाशिकमधील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच ही आणखी एक मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे आज दिवस हा भीषण अपघातांचा ठरला आहे. रोडवरील अपघातांनी आज अनेक जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे अपघात आता प्रशासनाचीही डोकेदुखी ठरु लागले आहेत. हे अपगात रोखण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे.
हे अपघाताचे फोटो पाहिल्यास हा अपघात किती भीषण आहे. हे सहज लक्षात येतं. यात ही धडक झाल्यानंतर इनोव्हा गाडी रस्त्याच्या बाजुला जात आजुबाजुच्या झुडपात घुसली आहे. तर दुसरी गाडीही समोरुन आणि साईडवरून पूर्ण फुटली आहे. धडक झाल्यानंतर ही गाडीही धडकेने रस्त्यावरून बाहेर गेल्याचे दिसून येते. या अपघातानंतर काही काळ मृतदेह हे रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आलं आहे. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र यातील काही जणांना रुग्णालयात पोहचण्याच्या आधी प्राण सोडले होते. यात दोन लहान मुलांचाही समावेश असल्याने जास्त हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातानंतर रस्त्यावरही मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर काही लोक मदतीसाठी तात्काळ धावले. तर काही बघ्यांनीही यावेळी गर्दी केली आहे. रस्त्यावर रक्त सांडल्याचे समोर आलेल्या काही फोटो आणि व्हिडिओतून दिसून येत आहे. रस्त्यावरचा वेग कधी कधी किती नडतो, हेच दाखवणारा हा अपघात आहे. एका अपघाताने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्यामुळे वेळीच वेगावर नियंत्रण ठेवून असे विपरीत प्रकार टाळणे गरजेचे असते.