Beed : भाजप शहराध्यक्षाच्या आत्महत्येचं गूढ वाढलं! भगीरथ बियाणी यांच्या भावाने जबाबात म्हटलं की,…
भगीरथ बियाणी यांची आत्महत्या, हत्या की आणखी काही? भगीरथ बियाणी यांचा भाऊ याचा जबाब पोलिसांनी नोंदवला!
महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड : बीडमध्ये (Beed Crime News) भाजप शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या (BJP City Chief Bhagirath Biyani) केल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी (Beed News) आता बियाणी यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेण्यास सुरुवात केलीय. बियाणी यांच्या भावाने नोंदवलेल्या जबाबाने अनेक शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूचं कारण कारण नेमकं काय? आतहत्मा, हत्या की आणखी काही? असा प्रश्न उपस्थित होतोय.
जबाबात नेमकं काय?
मृत भगीरथ बियाणी यांचे बंधू बाळकृष्ण बियाणी यांनी आपल्या जबाबत जो अंदाज वर्तवला, त्याने पोलिसांनाही विचार करायला भाग पाडलंय. बंदूक साफ करताना मिसफायर झाल्याचा अंदाज बाळकृष्ण बियाणी यांनी जबाबात व्यक्त केलाय. त्यामुळे या घटनेचं गूढ वाढलंय.
मोबाईल दडलंय सत्य?
दरम्यान, मृत भगीरथ बियाणी यांचा मोबाईल देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय. त्यांच्या मोबाईलमधून फोन कॉल्सची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या कॉल डिटेल्समधून काय माहिती समोर येते, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. सध्या पोलिसांकडून भगीरथ बियाणी यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत.
कोण होते भगीरथ बियाणी?
भगीरथ बियाणी हे बीडच्या राजकीय आणि सामाजित क्षेत्रातलं परिचयाचं नाव होतं. ते नेहमी हसतखेळत काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त मंगळवारी सकाळी समोर आलं होतं. त्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला होता.
याबाबतीची माहिती मिळाल्यानंतर खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे देखील तातडीने बैठक सोडून जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून रुग्णालयात पोहोचून त्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली होती. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी पंचनामा केला होती. सध्या बीड पोलिसांकडून या संपूर्ण प्रकपणी पुढील तपास केला जातोय.