Beed CCTV : ‘तुझ्या डोक्यावर लावलेला विग बराय का?’ विचारलं आणि डॉक्टर भिडले!
जेव्हा डॉक्टर बिर्ला डॉक्टर हरकुट यांच्या अंगावर धावून जातात! फ्री स्टाईल हाणामारी कॅमेऱ्यात कैद
बीड : रस्त्यावरच्या गावगुंडांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या, वाचल्या किंवा पाहिल्याही असतील. पण बीडमध्ये चक्क दोन डॉक्टरच भिडलेत. दोन डॉक्टरांमध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या हाणामारीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. डॉक्टर विठ्ठलदास हरकुट आणि डॉक्टर अतुल बिर्ला यांच्यामध्ये मारामारी होण्यामागचं अजब कारणंही आता समोर आलं आहे. शुल्लक कारणावरुन दोघा डॉक्टरांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीप्रकरणी पोलिसांनीही तक्रार दाखल करुन घेतली आहे. पुढील तपास सुरु आहे.
कशामुळे झाली मारामारी?
विठ्ठलदास हरकुट आणि अतुल बिर्ला हे दोघेही जण पेशाने डॉक्टर आहे. डॉक्टर हरकुट यांनी अतुल बिर्ला यांना एक प्रश्न विचारला होता. तुझ्या डोक्यावर लावलेला विग बरा आहे का? असं बिर्ला यांना विचरण्यात आलं होतं. डॉक्टर हरकुट यांच्या या प्रश्नावरुन डॉक्टर बिर्ला संपातले.
हेच कारण पुढे करत बिर्ला यांनी चाण जणांसह हरकुट यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
पाहा व्हिडीओ :
#beed : जेव्हा दोन डॉक्टर एकमेकांच्या जीवावर उठतात, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, गेवराई तालुक्यातील घटनेनं चर्चांना उधाण (VC : टीव्ही 9 मराठी, बीड प्रतिनिधी) pic.twitter.com/65yo1nQnkb
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 9, 2022
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही इथं हा प्रकार घडला. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फोनवर बोलताना दिसून आली आहे. त्या वेळी दुसरी व्यक्ती मागून येते आणि फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रयत्न करते.
दरम्यान, यावेळी दोघे भांडत असल्याचं पाहून इतक काही जण मध्ये पडतात. दोघांना आवरण्याचा प्रयत्न करतात. बाचाबाची आणि हाणामारी रोखण्यासाठी एकमेकांपासून दोघांना दूर नेलं जातं. पण त्याचवेळी इतकही काही जण मारहाण करण्याच्या इराद्याने आल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे.
आता गेवराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपी डॉक्टरांचा शोध घेतला जातो आहे. मात्र संपूर्ण तालुक्यात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. शुल्लक कारणावरुन झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीवरुन दोघा डॉक्टरांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.