विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास

सोनाली जाधव या विवाहित नर्सचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटात पालीजवळ सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित नर्सचा ओढणीने गळफास
बीडमध्ये विवाहित नर्सची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 12:03 PM

बीड : विवाहित नर्सने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. झाडाला ओढणीने गळफास घेऊन तिने आपल्या आयुष्याची अखेर केली. विवाहित प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

सोनाली जाधव या विवाहित नर्सचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटात पालीजवळ सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मांजरसुंबा घाटातील एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचा दावा

सोनाली बीडमधील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करत असल्याची माहिती आहे. प्रेम संबंधातून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. सोनालीचा प्रियकर अक्षय आव्हाड हा देखील विवाहित होता. त्याने लग्नास नकार दिल्याने सोनाली जाधवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

औरंगाबादेत प्रियकरापाठोपाठ प्रेयसीची आत्महत्या

दरम्यान, ज्या प्रियकरासोबत विवाह करण्याचं नियोजन झालं होतं, त्या मुलानेच आत्महत्या केल्यामुळे तणावातून 17 वर्षीय मुलीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी आपापल्या कुटुंबीयांनाही राजी केले होते. त्यानुसार दोघांचा विवाहही ठरवण्यात आला होता. मात्र विवाह ठरलेल्या तरुणाने 15 दिवसांपूर्वी अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे तीही दोन आठवड्यांपासून मानसिक तणावात असल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

गर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने प्रियकराची आत्महत्या

(Beed Married Nurse allegedly commits suicide after Married Boyfriend ditches to marry)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.