शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैसे मिळवून देतो, आमिष दाखवत भाच्याने ‘मामा’ बनवलं, 70 लाखांचा गंडा घालून गोव्यात केली मजा

सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार कानावर येत असतात. तेव्हा अज्ञात भामटे लोकांना फसवतात. पण बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका भाच्यानेच त्याच्या मामाची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातला.

शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैसे मिळवून देतो, आमिष दाखवत भाच्याने 'मामा' बनवलं,  70 लाखांचा गंडा घालून गोव्यात केली मजा
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 11:30 AM

महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 1 डिसेंबर 2023 : जास्त कष्ट न करता, झटपट पैसे मिळावेत अशी बऱ्याच लोकांची सुप्त इच्छा असते. त्याच मोहात अडकून अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामध्ये काही वेळा फसवणूकही होऊ शकते. सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार कानावर येत असतात. तेव्हा अज्ञात भामटे लोकांना फसवतात. पण बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका भाच्यानेच त्याच्या मामाची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातला. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

शेअर मार्केटमध्ये दामदुप्पट पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवून भाच्याने आपल्या मामाकडून सत्तर लाख रुपये उकळले. हा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. मामाची फसवणूक करून त्याच पैशावर भाच्याने गोव्यात मौज मजा केली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी तिघांना अटकही केली आहे. सय्यद तलहा सय्यद जमाल, यश गायकवाड यांच्यासह आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पैसे लुटले आणि गर्लफ्रेंडसह गोव्याला जाऊन केली मजा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील व्यापारी शेख इसाक शेख महमूद यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तलहा सय्यद हा त्यांचा नातेवाईक आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, मी तुम्हाला ती रक्कम दुप्पट करून दाखवतो, असे आमिष तलहा सय्यद याने दाखवले. दुप्पट पैशांच्या मोहापायी शेख इसाक शेख महमूद यांनी तलहा सय्यद याच्यावर विश्वास ठेवला. आणि जुलै 2022 मध्ये ऑनलाइन माध्यमातून 15 लाख रुपये दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी इतरांकडून उसनवारी करत 55 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र आरोपींनी याच पैशांचा गैरवापर केला. आणि गर्लफ्रेंडसह गोव्याला जाऊन त्याच पैशांवर मौज-मजा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

बराच काळ उलटूनही पैसे न मिळाल्याने फिर्यादीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघा आरोपींना अटक केली. तर आरोपींपैकी एकाची गर्लफ्रेंडही त्यांच्यासोबत गोव्याला होती, तिला समज देऊन पोलिसांनी तिला घरी परत पाठवले. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.