परळीत चोरांचा वावर वाढला, रात्री अनेक गाड्यांची तोडफोड, रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनाही मारहाण

परळी शहरातांतल्या काही भागात रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. तसंच रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात चोरांची एकच दहशत निर्माण झाली आहे. (Beed Parali Vehicle Vandalized by a mob at midnight)

परळीत चोरांचा वावर वाढला, रात्री अनेक गाड्यांची तोडफोड, रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनाही मारहाण
परळीत वाहनांची तोडफोड
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 2:56 PM

परळी (बीड) : परळीत सध्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील काही भागात रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. तसंच रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांनाही मारहाण केली. त्यामुळे परिसरात चोरांची एकच दहशत निर्माण झाली आहे. (Beed Parali Vehicle Vandalized by a mob at midnight)

परळीतील अनेक भागांत तोडफोड

परळी शहरातील तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार आदी भागात घरासमोर लावलेल्या गाड्यांची भुरट्या चोरांनी तोडफोड केली आहे. गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे रस्त्याने जात असताना आडव्या आलेल्या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.

रॉड, दगड-विटांनी गाड्यांच्या काचा फोडल्या

अज्ञात गुंडांनी मोटार सायकलवरून येत रॉड, दगड-विटांनी काचा फोडून दहशत निर्माण केली. स्थानिकांमध्ये या प्रकाराने भीती निर्माण झाली असून त्यांनी पोलिस प्रशासनाने यासंदर्भात कडक पावलं उचलावीत, अशी विनंती केली आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

दुसरीकडे रोज रात्री पोलिसांनी पेट्रोलिंग जरी केली असती तर असे प्रकार घडले नसते असंही स्थानिकांनी म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(Beed Parali Vehicle Vandalized by a mob at midnight)

हे ही वाचा :

तरुणाचा यूट्युब पाहून बॉम्ब बनवण्याचा प्रयोग फसला, डिफ्युज करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव

4 दिवसांपासून बेपत्ता, आज थेट मृतदेह आढळले; 2 अल्पवयीन मुलींची हत्या की आत्महत्या? शहापूरमध्ये एकच खळबळ

नवरा म्हणाला, ‘वांग्याची भाजी दे’, बायको म्हणाली, ‘संपलीय’, चिडलेल्या नवऱ्याने रॉकेल टाकून पत्नीला पेटवलं

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.