बीडमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, संतप्त शेतकऱ्यांचा वाळू माफियांना घेराव
वाळूची वाहतूक चोरट्या मार्गाने करण्यासाठी वाळू माफिया शेताचा वापर करत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होते.
बीड : वाळू माफियांकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला (Sand Mafia Try To Kill Farmer). त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वाळू माफियांना घेराव घातला. संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची तोडफोडही केली. मात्र, तहसील आणि पोलीस प्रशासनाला कळवून देखील अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे (Sand Mafia Try To Kill Farmer).
बीड जिल्ह्यातील नदी काठच्या परिसरात अवैधरित्या वाळू उत्खनन करण्याचे काम जोरात सुरु आहे. वाळूची वाहतूक चोरट्या मार्गाने करण्यासाठी वाळू माफिया शेताचा वापर करत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होते. बुधवारी पारगाव सिरस येथे वाळू माफियांच्या ट्रॅक्टरला विरोध केल्यानंतर सदर शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी चांगलेच संतापले. संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची तोडफोड करुन तब्बल 1 तास वाळू माफियांना घेराव घालत अडवून धरले. मात्र, तहसील आणि पोलीस प्रशासनाला कळवून देखील अद्याप कसलीही कारवाई झाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला (Sand Mafia Try To Kill Farmer).
बीड तालुक्यातील पारगाव, सिरसमार्ग, तरतटेवाडी, बहिरवाडी हा परिसर नदी काठचा आहे. परिसरातील वाळू माफिया नदीत जाऊन बिनधास्तपणे वाळू उपसा करतात. शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रार देऊनही महसूल प्रशासनाने अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप आहे. काल दुपारी काही वाळू माफिया वाळू उपसा करुन शेतातून जात होते. शिवाय नदी पत्रात मोठे खड्डे पडल्याने नदी पात्र उध्वस्त झालं आहे. म्हणून वाळू माफियांनी अवैधरित्या शेतातून रस्ता केला आहे.
ट्रॅक्टर शेतातून नेत असल्यामुळे शेताचे नुकसान झाले आणि याचाच जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न या वाळू माफियांनी केला. यावेळी बाजुलाच असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टरची तोडफोड केली आणि वाळू माफियांना घेराव घातला. तब्बल एक तास हे नाट्य सुरु होते.
यादरम्यान, महसूल यंत्रणेला फोन करुन देखील प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही. मुजोर वाळू माफियांवर कारवाई करा, असे निवेदन शेतकऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरातील शेतकरी दहशतीत आहेत.
प्रवासी ट्रॅव्हल्समधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक, सापळा रचत 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगतhttps://t.co/uCR0jAYcAS #Panvel
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 29, 2020
Sand Mafia Try To Kill Farmer
संबंधित बातम्या :
लातुरात एक कोटीच्या विम्यासाठी मजुराची हत्या, आठ वर्षांनंतर पत्नीला अटक
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यानं 3 माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल