VIDEO | शिवसेना जिल्हाप्रमुखांवर शहरप्रमुखाने तेल फेकलं, समर्थकांकडून चोप, बीडमध्ये जोरदार राडा

आप्पासाहेब जाधव यांची नुकतीच बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर निवड करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

VIDEO | शिवसेना जिल्हाप्रमुखांवर शहरप्रमुखाने तेल फेकलं, समर्थकांकडून चोप, बीडमध्ये जोरदार राडा
शिवसेना बीड जिल्हाप्रमुखांवर तेल फेकल्याने राडा
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 2:27 PM

बीड : शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरुन (Beed Shiv Sena) बीडमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Aappasaheb Jadhav) यांच्या अंगावर तेल फेकल्याबद्दल जाधव समर्थकांनी माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके (Dhananjay Papa Solanke) यांना चोप दिला. या राड्याची घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Beed Shiv Sena District Chief Aappasaheb Jadhav Ruckus after Dhananjay Papa Solanke throws oil)

सामूहिक राजीनाम्याचा इशारा

शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीवरुन अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आप्पासाहेब जाधव यांची नुकतीच बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर निवड करण्यात आली. त्यानंतर “शिवसेना जिल्हाप्रमुख बदल कोणाच्या भल्यासाठी?” असा सवाल उपस्थित करत पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला होता.

आप्पासाहेब जाधव यांच्याविरोधात घोषणा

केज, माजलगाव आणि परळी मतदार संघाच्या जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी आता सचिन मुळूक यांच्याऐवजी आप्पासाहेब जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद व्यक्त केली होती. नवनिर्वाचित जिल्हाप्रमुखांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत, जाधव यांच्या पोस्टारला जोडे मारो आंदोलनही करण्यात आले होते.

जाधवांवर तेल फेकणाऱ्या सोळंकेंना चोप

नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव निवडीनंतर पहिल्यांदाच बीडला आले. यावेळी आप्पासाहेब जाधव यांच्या अंगावर माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके यांनी तेल फेकल्याचा आरोप आहे. तेल फेकल्यामुळे जिल्हाप्रमुख जाधवांच्या संतापलेल्या समर्थकांनी शहर प्रमुख सोळंके यांना यथेच्छ चोप दिला. माजलगावमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बीडमध्ये शिवसेना युवा प्रमुखावर तलवारीने हल्ला

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, बीडमध्ये शिवसेना कार्यकर्तीकडून शाईफेक

(Beed Shiv Sena District Chief Aappasaheb Jadhav Ruckus after Dhananjay Papa Solanke throws oil)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.