नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : सध्या online AI fraud मध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करीत परिचित व्यक्तीच्या आवाजाचा आणि व्हिडीओच्या नमून्याचा वापर करुन आपल्या मोबाईल फोनवरुन एआय कमांडने कॉल करीत आहेत. या तंत्राचा वापर इतका सहज झाला आहे की पीडीताला खरोखरच विश्वास होतो की त्याचा परिचित अडचणीत असल्याचे वाटते. यासाठी सायबर गुन्हेगार डीप फेक एआय बॉट टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहेत.
तुम्हाला जर अनोळखी क्रमांकांवरुन व्हिडीओ कॉल आला तर तुम्ही सावध रहावे असेच सध्या वातावरण आहे. असे कॉल न उचलणे तुमच्या फायद्याचे आहे. कारण नव्या एआय टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या परिचितांचा हुबेहुब आवाज तयार करणे, तसेच परिचित व्यक्तीचा व्हिडीओ देखील तयार करणे सहज शक्य झाले आहे. अज्ञात क्रमांकावरुन फोन येताच तुमची परिचित व्यक्ती अडचणीत असल्याने तुम्ही पैसे द्याल तर तुमची फसवणूक झालेली असेल.
ही परिचित व्यक्ती कोणीही असू शकतो. तुमचा मित्र, जवळचा नातेवाईक अगदी तुमचा भाऊ, पिता आणि पत्नी देखील असू शकते. त्यांचे हुबेहुब आवाज तयार करणे एआय तंत्राने सहजसाध्य झाले आहे. डीप फेक एआय बॉट टेक्नॉलॉजीने हे शक्य झाले आहे. सर्वोच्च कोर्टाचे वकील आणि आर्टीफीशियल इंटेलिजेंस लॉ हबचे मुख्य कार्यकारी पवन दुग्गल यांनी म्हटले आहे की असा पहीला प्रकार केरळ राज्यात घडला आहे. आणि अन्य राज्यातही पसरत आहे.
एखाद्या अनोळखी मोबाईल नंबरवरुन जरी कॉल आले असले तरी तुम्हाला तुमचा जवळचा व्यक्ती अडचणीत असल्याचे पाहून त्याची दया येईल आणि तुम्ही तातडीने त्याला पैसे ट्रान्सफर कराल. तुम्हाला वाटेल की संकटातून दूर झाल्यावर ती व्यक्ती तुमचे पैसे परत करेल. परंतू वास्तवात हा कॉल बोगस असू शकतो. एअर इंटेलिजन्सचा वापर करुन डीप फेक तंत्राने हा कॉल आलेला असू शकतो.
डेक्कन हेराल्ड मध्ये आलेल्या वृत्तानूसार केरळच्या कोझीकोडे येथील राधाकृष्णन यांना त्यांच्या आंध्रप्रदेशातील एका मित्राचा अनोळखी क्रमांकावरुन व्हिडीओ कॉल आला त्यामुळे त्यांनी चाळीस हजार ट्रान्सफर केले. नंतर त्या मित्राने कॉल केलाचे नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची फसवणूक झाली आहे.
जेव्हा तुमची अत्यंत परिचित व्यक्ती अचानक अज्ञात क्रमांकावरुन फोन करत असेल किंवा व्हिडीओ कॉल करत असेल तेव्हा तिच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा तिच्या परीचित मोबाईल क्रमांकावर पुन्हा फोन करुन खातरजमा करावी तरच पुढील आर्थिक व्यवहार करावेत असा सल्ला सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत,