अज्ञात व्यक्ती आणि महिला उमेवाराच्या पतीचे संभाषण, ‘सेटिंग’ करून देण्याचे आमिष, या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण ?

भंडारा जिल्ह्यातील कोतवाल भरती प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. महिला उमेदवारांच्या पतीचे आणि अज्ञात व्यक्तीचे संभाषण सोशस मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहे. आर्थिक गैरव्यवहारातून किती जणांची नियुक्ती ? असा प्रश्न लोकं करु लागले आहेत.

अज्ञात व्यक्ती आणि महिला उमेवाराच्या पतीचे संभाषण, 'सेटिंग' करून देण्याचे आमिष, या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण ?
crime news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 12:19 PM

भंडारा : भंडारा (bhandara) जिल्ह्यात कोतवाल भरती परीक्षेत फसवणूक, त्याचबरोबर नियुक्तीत गोंधळ हा विषय सध्या संपूर्ण जिल्ह्यात तापलेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. परंतु यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी (bhandara police) दिली आहे. तुमसर तालुक्यातील एका महिला उमेदवाराच्या पतीला एका भ्रमणध्वनीवर ‘सेटिंग’ करून देण्याचे आमिष (bhandara Kotwal recruitment case) दाखवले आहे. त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण ? तालुक्यात आणि जिल्ह्यात अशाप्रकारे आर्थिक गैरव्यवहारातून किती जणांची नियुक्ती करण्यात आली ? असे अनेक प्रश्न पोलिसांना आणि तिथल्या नागरिकांना पडले आहेत.

भंडारा तालुक्यात कोतवाल भरती प्रकरणात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. कोतवाल भरती परीक्षेच्या निकालात नाव पुढे करून देण्याचे आमिष देत पैशांची मागणी करण्यात आल्याचे क्लिपमध्ये म्हटले आहे. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील विपुल दहाट यांना कोतवाल भरती परीक्षेच्या संदभांत एका अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधण्यात आला होता. ज्यावेळी त्याचा नंबर मोबाईल एका अॅपवरती चेक करण्यात आला, त्यावेळी सुनील अत्रे असं दिसत होतं अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

आता त्या व्यक्तीचा नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. निकालाच्या दिवशी या व्यक्तीने दहाट यांना पुन्हा फोन केला, आणि आपण अमितच्या भ्रमणध्वनीवरून बोलल्याची आठवण करून दिली. त्यानंतर त्याने मूळ मुद्यावर येत दहाट यांना ‘कसे करायचे’, असे विचारले. त्यानंतर त्याने दहाट यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणात एक मोठी ‘लॉबी’ असल्याचे तसेच काही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हात रंगले असल्याचे आरोप एआयएसएफ’चे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी केला आहे. कोतवाल भरती, पोलीस पाटील भरती परीक्षा आणि नियुक्ती यात तुमसर व मोहाडी तालुक्यातही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात भंडारा पोलीस अधीक्षक कारवाई करणार आहेत. सदर ऑडियो क्लिपचा तपास सायबर सेल आणि पोलीसांना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरचं हे सगळं प्रकरण आम्ही उजेडात आणू, त्याचबरोबर मुख्य आरोपीला सुध्दा ताब्यात घेऊ असं पोलिस भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.