Bhandara : बाईक चोरट्यांची टोळी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, पोलिसांनी 4 आरोपींना अटक करत 5 बाईक केल्या जप्त!

अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसरा येथून 16 जून रोजी घरासमोरुन दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. दरम्यान लाखांदूर येथे दुचाकीची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. लाखांदूर येथे पथकासह पोहचून पोलिसांनी सापळा रचला असता संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या रोषण कोचे याला विचारपूस केली असताना त्याने उडवा उडवीची उत्तरे पोलिसांना दिली.

Bhandara : बाईक चोरट्यांची टोळी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, पोलिसांनी 4 आरोपींना अटक करत 5 बाईक केल्या जप्त!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 9:18 AM

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. जिल्ह्याबाहेरील बाईक चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात आता भंडारा पोलिसांना (Police) यश आले. बाईक चोरणारी टोळी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली असून यात पथकाने चौघांना ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे या टोळीकडून तब्बल 5 बाईक (Bike) जप्त करण्यात आल्या आहेत. या बाईक चोर टोळीने फक्त भंडाऱ्यातच नाही तर मध्यप्रदेशमध्येही बाईक चोरल्याची माहिती उघडकीस आलीयं. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

16 जून रोजी घरासमोरुन दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली

अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसरा येथून 16 जून रोजी घरासमोरुन दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. दरम्यान लाखांदूर येथे दुचाकीची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. लाखांदूर येथे पथकासह पोहचून पोलिसांनी सापळा रचला असता संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या रोषण कोचे याला विचारपूस केली असताना त्याने उडवा उडवीची उत्तरे पोलिसांना दिली.

हे सुद्धा वाचा

सापळा रचत पोलिसांनी चोरांना केले अटक

रोशनला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आरोपी विरु कोटांगले व इरफान शेख यांच्या मदतीने बाईक चोरत असल्याचे कबुल केले. पोलिसांनी रोशनला ताब्यात घेऊन पाच बाईकही जप्त केल्या. आरोपींनी भंडारा जिल्ह्याच्या कोसरा व लाखांदूर तसेच मध्यप्रदेशातील लिंगमारा येथून बाईक चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या अटकेने बाईक चोरी करणारी एक मोठी टोळी पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.

लाखांदूर येथे चोरीच्या बाईक विक्री होणार असल्याची माहिती

बाईक चोरी करणाऱ्या टोळीमध्ये रोशन दिनेश कोचे वय (23) रा. वडसा जिल्हा गडचिरोली, विरु प्रभाकर कोटांगले वय (23), इरफान ऊर्फ सुलतान इसराईल शेख वय (28) वर्ष दोघेही राहणार अड्याळ, तालुका पवनी अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी खास सापळा रचना होता. लाखांदूर येथे चोरीच्या बाईक विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी खास सापळा रचला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.