Bhandara Crime : जुना वाद उफाळून आला आणि घात झाला, भररस्त्यात त्यांनी तरुणाला गाठला अन्…

जुन्या वादातून हत्या होण्याचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. क्षुल्लक कारणातून थेट जीवच घेण्याच्या घटना वाढत आहेत.

Bhandara Crime : जुना वाद उफाळून आला आणि घात झाला, भररस्त्यात त्यांनी तरुणाला गाठला अन्...
जुन्या वादातून तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 9:57 AM

भंडारा / 22 ऑगस्ट 2023 : भंडाऱ्यात हत्यासत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा हत्येची घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून एका महाविद्यालयीन तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक कटकवार असे मयत तरुणाचे नाव आहे. भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे अभिषेकची जुन्या वादातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तलवारीसह तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपींची

आठ दिवसांपूर्वी अभिषेकचा आरोपींसोबत वाद झाला होता

आठ दिवसांपूर्वी अभिषेकचे काही तरुणांसोबत सामान्य रुग्णालय परिसरात भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी अभिषेकला आरोपींनी गणेशपूर येथे बोलावून घेतले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृतक अभिषेक कटकवार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील टप्पा मोहल्यात वास्तव करत होता.

जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय

जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, आठ दिवसाआधी शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातून आलेल्या सात संशयित आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दोन महिन्यापूर्वी भंडारा शहरात गांधी चौकात जुन्या वादातून हत्या झाली होती. या प्रकरणात मयत आणि आरोपी या दोघांच्याही मृत्यू झाला होता. दोन्ही तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी होते. त्यानंतर आज पुन्हा भंडारा शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या गणेशपूर येथे हत्येची घटना घडली.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.