मोबाईलने 328 संसार तोडले, पण त्यातले 117 जोडले, कुणी केली ही करामत पाहा ?
भंडारा जिल्ह्यात वर्षभरात तब्बल 328 जोडप्याचा काडीमोड झाला असून त्यात घटस्फोटाचे सर्वाधिक प्रसिद्ध कारण म्हणजे मोबाइल वापर...
भंडारा : आज जग डिजिटल (digital) झाले आहे, आता डिजिटल म्हटल्यावर मोबाइल जवळ नसणे, असे होऊच शकत नाही. मात्र याच मोबाईल घटस्फोटास (Divorce) कारणीभूत ठरला आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वर्षभरात तब्बल 328 जोडप्याने घटस्फोट घेऊन टाकल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. तर दूसरीकडे अजूनही भरोसा सेलकडे तक्रारीच्या रांगा लागल्या आहे. भंडारा जिल्ह्यात वर्ष भरात 404 जोडप्यानी भंडारा भरोसा सेलकडे तक्रार दाखल केल्या असून त्यामध्ये 328 जोडप्याने घटस्फोट घेतला आहे. तर अजुन 74 ते 75 अर्ज बाकी आहे. यात 18 केसेस या कोर्टात गेल्या असून गुन्हा ही नोंदविला गेला आहे, असे असले तरी भंडारा भरोसा सेलला मात्र 117 जोडप्याचा संसार वाचविता आला आहे अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक भरोसा सेल भाग्यश्री देशपांडे यांनी सांगितली.
फोनवरती गप्पा मारल्यामुळे पती-पत्नीत संशय ही बळावला
आज मोबाइलचा अतिवापर सुरु झाला असल्याने तासनतास मोबाइलवर राहिल्याने आजार तर वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. मात्र नात्यात संवाद संपला जात आहे. तर सतत मोबाईल गप्पा मारल्यामुळे पती-पत्नीत संशय ही बळावला आहे. त्याचा परिणाम कुटुंबावर होत असून पती-पत्नी एकमेकांबाबत संशय घेऊन वेगळे होत आहेत अशी माहिती महिला समन्वयक अश्विनी डेकाटे यांनी दिली.
काहीवेळेला हे भांडण टोकाला जातं
राज्यात अनेक ठिकाणी मोबाईलमुळे घरात भांडण होत असल्याची तक्रार असते. काहीवेळेला हे भांडण टोकाला जात, त्यानंतर नवरा बायको विभक्त होतात हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे पोलिसांनी एक चांगली भूमिका निभावून लोकांचे संसार वाचवले आहेत.
राज्यात मोबाईलमुळे अनेकांचे घटस्फोट झाल्याचे आकडेवारी मोठी असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेकांचे संसार वाचवण्यासाठी एकमेकांना समजून घ्यायला हवं असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसाचं भरोसा सेल हे चांगलं काम करीत असून राज्यात सुध्दा अशाचं कामगिरीची अपेक्षा अनेकांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यात भंडारा भरोसा सेल कौतुक देखील केलं जात आहे.