राजस्थानहून भटजीला बोलावले, पूजा केली, भोजन दिले, दक्षिणा दिली; आणि शेवटी भटजीला…

इंदूरच्या चंदन नगरमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीकांत यांनी आपल्या राहत्या घरी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. या पूजेसाठी त्यांनी राजस्थानहून कुंजबिहारी शर्मा यांना बोलावले होते.

राजस्थानहून भटजीला बोलावले, पूजा केली, भोजन दिले, दक्षिणा दिली; आणि शेवटी भटजीला...
उत्तर प्रदेशात पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले
Image Credit source: TV9
| Updated on: Oct 03, 2022 | 10:18 PM

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी बोलावण्यात आलेल्या भटजीला मारहाण (Beating) करत त्याचा कान कापल्याची घटना इंदूरमधील चंदननगर (Indore Chandan Nagar) परिसरात घडली आहे. कुंजबिहारी शर्मा असे पीडित भटजीचे नाव आहे. विशेष म्हणेज या भटजीला खास राजस्थानहून पूजा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Three Arrested) केली आहे.

सत्यनारायणाच्या पूजेसाठी कुंजबिहारी यांना बोलावले होते

इंदूरच्या चंदन नगरमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीकांत यांनी आपल्या राहत्या घरी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. या पूजेसाठी त्यांनी राजस्थानहून कुंजबिहारी शर्मा यांना बोलावले होते. त्याप्रमाणे कुंजबिहारी यांनी लक्ष्मीकांत यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा सांगितली.

पूजा-पाठ पार पडल्यानंतर सर्वांनी एकत्र भोजन केले. त्यानंतर कुंजबिहारी यांना त्यांची दक्षिणा देण्यात आली. संपूर्ण कुटुंबीयांनी कुंडबिहारी यांचा रितसर पाहुणचारही केला. घरात आनंदाचे वातावरण होते.

रात्री सर्वजण झोपले असतानाच अचानक भटजीला शिवीगाळ आणि मारहाण

पूजेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कुंजबिहारी रात्री तेथेच थांबले होते. घरातील सर्वजण रात्री झोपेत होते. याचदरम्यान लक्ष्मीकांत आणि त्यांचा मुलगा विपुल अचानक रुममध्ये आले आणि त्यांनी कुंजबिहारी यांना जाब विचारण्यास सुरवात केली.

अरुण विचित्र वागत आहे, तुम्ही कशी पूजा केली ? असा जाब कुंजबिहारी यांना विचारला. यानंतर दोघांनी भटजीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लक्ष्मीकांत यांचा दुसरा मुलगा अरुणही तेथे आला आणि त्यानेही मारहाण करण्यास सुरुवात केली, असे कुंजबिहारी यांनी सांगितले.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, मग भटजीचा कान कापला

ते लोक एवढ्यावरच थांबले नाहीत. मारहाणीनंतर त्यांनी भटजीचा उजवा कानच कापला. पीडित भटजीचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले आणि त्यांनी कुंजबिहारी यांची सुटका केली.

याप्रकरणी कुंजबिहारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित भटजी पूजा-पाठ करण्यासाठी अनेक वेळा इंदूरला आले आहेत.