भिगवणच्या भरवस्तीत अवैध वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून तरुणीसह महिलेची सुटका
भिगवण पोलिसांनी शहरातील मध्यवस्थीत छापा टाकून दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केलीय. (Bhigwan Police)
इंदापूर: भिगवण पोलिसांनी भिगवणच्या रहिवाशी परिसरात छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत एका तरुणीसह महिलेची सुटका केली आहे. भिगवण पोलिसांनी शहरातील गजबजलेल्या रहिवाशी परिसरात अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखाण्यावर छापा टाकल्यानं खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रकमेसह 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(Bhigwan Police Arrested two person and rescue two ladies from kuntankhana)
दोघांना अटक, दोन महिलांची सुटका
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना गोपनीय सूत्रांकडून या प्रकरणी माहिती मिळाली होती. पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या रहिवासी इमारतीमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे माने यांनी पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती करत या ठिकाणी तातडीने छापा टाकला. यावेळी आरोपी मिनीनाथ रमेश गायकवाड वय 28 रा. मदनवाडी मुळगाव भगतवाडी तालुका करमाळा, रोहिदास गंगाराम दराडे, वय 29 रा. अकोले हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 20 वर्षाची तरुणी आणि 40 वर्षाची महिला यांच्याकडून अवैधपणे कुंटणखाना चालवीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी वापरत असलेले मोबाईल आणि रोख रक्कम मिळून 28 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.
भिगवण पोलिसांनी ही कारवाई पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे, नाना वीर, इंकलाब पठाण ,महिला पोलीस नाईक सारिका जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली.
पुणे-सोलापूर महामार्गावरील गजबजलेल्या रहिवासी भागात सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती या परिसरातील नागरिकांना नव्हती, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हा व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणपासून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे.
आधी ‘वादळाचा’ इशारा, आता बंदुकांसह इन्स्टा स्टोरी, इचलकरंजीत गुन्हेगारांची हिंमत वाढली https://t.co/BfSRRUs5hU #Kolhapur #CrimeNews #Ichalkaranji #InstagramStory #Gun
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
संबंधित बातम्या:
स्वीमिंग कोचची आत्महत्या, क्रीडा मंडळाच्या बाथरुममध्ये गळफास
सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ काही तासात उकललं, बोरांच्या वाटणीवरुन मित्रानेच संपवलं
चोरीच्या तपासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा; मुंबई पोलिसांची कामगिरी
(Bhigwan Police Arrested two person and rescue two ladies from kuntankhana)