Bhiwandi Crime : भिवंडीतील ‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे रहस्य अखेर झाले उघड,हत्या करून लिव्ह-इन पार्टनर झाला फरार

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने एखच खळबळ माजली होती. मात्र तिचा प्रियकर फरार कुठेच सापडत नसल्याने संशयाची सुई त्याच्याच दिशेने वळत होती.

Bhiwandi Crime : भिवंडीतील 'त्या' महिलेच्या मृत्यूचे रहस्य अखेर झाले उघड,हत्या करून लिव्ह-इन पार्टनर झाला फरार
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 3:07 PM

भिवंडी | 20 सप्टेंबर 2023 : शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे एका महिलेची हत्या (murder news) करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. दुर्गंधी पसरल्याने तीन दिवसानंतर या खुनाचा छडा (crime news) लागला होता. मात्र ही हत्या नेमकी कोणी केली हे स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला.

भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे मधू नावाची एक महिला (वय 35) तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. यापूर्वी तिचा विवाह झाला होता, मात्र ती पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर तिच्या प्रियकरासोबतच ती घरात राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती राहत असलेल्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी जोर लावून दरवाजा उघडला असता त्या महिलेचा मृतदेह किचनमध्ये सापडला. तिचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती.

तालुक्यातील कोनगाव येथील गणेश नगर शाम बाग मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता, तिचा प्रियकर फरार असल्याचे समोर आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात फरार प्रियकर शबीर याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तो अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला मधू आणि आरोपी शब्बीर हे दोघे अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामाला होते. तेथेच त्या दोघांची ओळख झाली व हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांचे अनैतिक संबध निर्माण झाले.

त्यानंतर या दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेश नगर येथील इमारतीत तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेतली. आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. विशेष म्हणजे हत्या झालेली महिला मधू, हिची अनिता नावाची मैत्रीण देखील तिच्या सोबत राहत होती. 15 सप्टेंबर रोजी मधू व शब्बीर या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले असता शब्बीरने रागाच्या भरात तिचा गळाच चिरला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या दोन्ही हाताच्या नसा कापून तिला ठार केले.

हत्येनंतर त्याने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो फरार झाला. मधू हिचीमैत्रीण अनिता हिने दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिस ठाण्यात शबिर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.