Bihar Crime : ‘दुष्ट आत्मा आहे…’ म्हणत घरात घुसलेल्या तांत्रिकाकडून अल्पवयीन मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न

पंचायतीकडून प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. तक्रार केल्यास जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Bihar Crime : 'दुष्ट आत्मा आहे...' म्हणत घरात घुसलेल्या तांत्रिकाकडून अल्पवयीन मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
तांत्रिकाकडून अल्पवयीन मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 5:30 PM

बिहार : एका तांत्रिकाने एका अल्पवयीन मुली (Minor Girl)वर दुष्ट आत्म्याची सावली असल्याचे सांगून तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिहारमधील सीतामढीमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या आईने सांगितले की, ती तिच्या मुलीसोबत घरात होती, त्याचवेळी कथित बाबा आला. त्यानंतर तुमच्या मुलीला दुष्ट आत्म्याने ग्रासले आहे, असे सांगत तिला बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मुलीला घरात कोंडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न सुरू केला. अल्पवयीन मुलीने विरोध केला असता त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पंचायतीकडून प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न

ही घटना आठवडाभरापूर्वी घडली असून, त्यानंतर पंचायतीकडून प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. तक्रार केल्यास जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये नानपूरच्या पोखरैरा गावातील रहिवासी मुख्य आरोपी सनौल रहमान उस्मानी उर्फ ​​बाबा, अकीलउर रहमान उर्फ ​​नोमानी आणि मोहम्मद जमाली यांच्यासह पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उस्मानाबादमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याची घटना उस्मानाबादमध्ये घडली. शिक्षकाने विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. शिक्षक अमित माळी विरोधात कळंब पोलिस ठाण्यात कलम 376,(2)(फ)भा दं वि सह 4,8,12, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करून कळंब येथील फिर्यादीच्या आत्याच्या घरी कुणी नसताना तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. (Bhondubaba attempted to rape a minor girl in Bihar)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.