पोटात दुखू लागल्याने चेक केलं, नऊवीमधील मुलगी गर्भवती झाल्याचं समोर, तेराव्याच्या विधीवेळी… धक्कादायक घटना समोर!

सोशल माध्यमांवरील ओळखही अनेकांना महागात पडली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे लहान मुलींना नराधम आता वासनेची शिकार बनवू लागले आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

पोटात दुखू लागल्याने चेक केलं, नऊवीमधील मुलगी गर्भवती झाल्याचं समोर, तेराव्याच्या विधीवेळी... धक्कादायक घटना समोर!
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 10:10 PM

नवी दिल्ली : कधी कोणाची वासना बदलेल काही सांगता येत नाही. अत्याचाराच्या घटनांमध्ये आता आरोपी हा ओळखीतला किंवा नातेवाईकांमधील निघत असल्याचं अनेक प्रकरणात दिसून आलं आहे. त्यामुळे कधीही डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवताना विचार करायला हवा. सोशल माध्यमांवरील ओळखही अनेकांना महागात पडली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे लहान मुलींना नराधम आता वासनेची शिकार बनवू लागले आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

14 वर्षांची नऊवीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी पोटात दुखू लागल्याचं पीडित मुलीने आपल्या आईला सांगितलं. आईने जास्त काही मनावर घेतलं नाही मात्र जेव्हा तिला वेदन सहन होण्याच्या पलीकडे गेल्यावर पीडितेला त्यांनी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांनाही विश्वास बसला नाही. डॉक्टरांची त्यांच्या घरच्यांना सांगण्याची हिंमत होत नव्हती मात्र सांगावं तर लागणार होतं.

डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं त्यावेळी पीडितेच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नऊवीत असणारी पीडिता गर्भवती असल्याचं त्यांना विश्वास ठेवणं कठीण जात होतं. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारलं, तेव्हा पीडितेने सर्व काही सांगितलं.

पीडित आपल्या घरच्यांसोबत 4 महिन्यांआधी टीटीनगर या ठिकाणी तेराव्याला गेली होती. त्यावेळी तिथल्या नातेवाईकांमधील असणाऱ्या आरोपी अंशु पाटवा (वय 18) याने तिला बाहेर फिरुन आणण्याच्या बहाण्याने तिला सूनसान जागेवर एका आड बाजूला नेलं. तिथं तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

आरोपीने घरी येताना तिला कोणालाही काही न सांगायची धमकी दिली. जर कोणाला काही बोललीस तर जीवे मारण्याची धमकीही त्याने तिला दिली. पीडितेने सांगितल्यानुसार आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वे गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून तो सध्या फरार झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळमधील टीटीनगरमधील आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.