CAR ACCIDENT : स्पीडमध्ये असलेली कार डिव्हाईडरला धडकली, नंतर 2 विद्युत खांब पाडले, लोकांना वाटलं…
स्पीडमध्ये असलेल्या गाडीचा काल बुलढाणा जिल्ह्यात अपघात झाला आहे. गाडी इतक्या स्पीडमध्ये होती की, अपघात पाहणाऱ्या लोकांनी डोक्याला हात लावला असल्याची माहिती मिळाली आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील खामगाव (khamgaon) शहरात नांदुरा रोडवर न्यायालयासमोर भरधाव कार (Car Accident) डिव्हायडरला जाऊन धडकली. यावेळी झालेल्या अपघातात दोन विद्युत खांब देखील तुटले आहेत. रात्रीच्या दरम्यान हा अपघात झाल्याने या वर्दळीच्या मार्गावर गर्दी कमी होती, अन्यथा मोठी दुर्घटना या ठिकाणी घडल्याच पाहायला मिळालं असतं. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कार चालकाला किरकोळ मार लागला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. तिथं ज्या लोकांनी हा अपघात पाहिला त्यांनी डोक्याला हात लावला. कारण गाडीचं स्पीड इतकं होतं की, मोठा आवाज झाला.
नेमकं काय झालं
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नांदुरा रोडवर न्यायालयासमोरुन टाटाची इंडिका गाडी निघाली होती. रात्रीची वेळ असल्याने गाड्यांची वर्दळ कमी असल्याचं नागरिक सांगत आहेत. गाडीचं स्पीड इतकं होतं की, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. सुरुवातीला गडबडलेल्या चालकाने डिव्हायडरला धडक दिली. त्यावेळी मोठा आवाज, त्यानंतर समोर असलेल्या 2 विद्युत खांबांना सुध्दा जोराची धडक दिली. हा अपघात अनेकांनी पाहिला आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी लोकांनी डोक्याला हात लावला. आजूबाजूला त्या गाडीच्या कोणतीही गाडी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची सुध्दा चर्चा आहे. गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. परंतू गाडीचं मोठं नुकसान झालं असल्याचं दिसत आहे.
रात्री गाड्यांचे अपघात होतात, म्हणून लोकं रात्री प्रवास करणं टाळतात. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमाराम रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत.