बुलढाणा बलात्कार पीडितेचा यू-टर्न, बलात्कार झालाच नसल्याचा महिलेचा जबाब

बुलढाणा सामूहिक बलात्कार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणी काल गुन्हा दाखल होत आरोपींनाही अटक झाली होती. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

बुलढाणा बलात्कार पीडितेचा यू-टर्न, बलात्कार झालाच नसल्याचा महिलेचा जबाब
बुलढाणा सामूहिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 5:44 PM

बुलढाणा : बुलढाण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. महिलेने आपल्या जबाबात यू-टर्न घेत आपल्यावर बलात्कार झालाच नसल्याचे म्हटले आहे. आरोपींनी फक्त मारहाण करीत आमच्याकडील पैसे आणि मोबाईल नेले. आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले, असे पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. आपल्यावर लैंगिक अत्याचार झालेलाच नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही, असेही महिलेने पोलिसांना लिहून दिले आहे. एव्हढेच काय या पीडित महिलेने न्यायालयातही तसाच जवाब लिहून दिला आहे.

संजय गायकवाड यांनी ठिय्या मांडून गुन्हा दाखल करायला लावला

बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात 35 वर्षीय महिलेवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा काल बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी तीन तास बोराखेडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून गुन्हा दाखल करून घेतला होता. घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने आता तिच्यासोबत कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे पोलीस जवाबात म्हटले आहे.

राजूर सेल्फीसाठी थांबले असताना घडली होती घटना

पीडित महिला आणि सोबतचा नातेवाईक हे दोघेही राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. यावेळी आठ जणांनी त्या दोघांना मारहाण करत त्यांच्या जवळील 45 हजार रुपये चाकूचा धाक दाखवत लुटले. तसेच दोघांचा मोबाईल सुद्धा हिसकावला आणि दरीत नेऊन महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. तशी तक्रारसुद्धा बोराखेडी पोलिसात दाखल झाली होती. यानंतर आठ आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तीन पथके तयार करून पाच आरोपींना जेरबंद सुद्धा केलं. मात्र आता पीडित महिलेने आपल्यासोबत असे काही घडलेच नाही, असे म्हटल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले. पोलीसही आता त्या बाजूने तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.