जंगलातील साखळदंडाने बांधलेल्या अमेरिकन महिलेचा बनाव उघडकीस, व्हिझा संपल्याने तिने…

सावंतवाडीमधील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळी बांधलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिला आढळली होती. या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली. तिच्या जबाबानुसार, पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र आता प्रकरणी मोठा ट्विस्ट आला असून त्या महिलेचं लग्नचं झालं नसल्याचं उघड झालं आहे. एवढंच नव्हे तर त्या महिलेनेच हा बनाव रचत स्वत:च स्वत:ला बांधून घेतल्याचेही तिने कबूल केले.

जंगलातील साखळदंडाने बांधलेल्या अमेरिकन महिलेचा बनाव उघडकीस, व्हिझा संपल्याने तिने...
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 1:14 PM

सावंतवाडीमधील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळी बांधलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिला आढळली होती. या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली. तिच्या जबाबानुसार, पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र आता प्रकरणी मोठा ट्विस्ट आला असून त्या महिलेचं लग्नचं झालं नसल्याचं उघड झालं आहे. एवढंच नव्हे तर त्या महिलेनेच हा बनाव रचत स्वत:च स्वत:ला बांधून घेतल्याचेही तिने कबूल केले.

मात्र हा सगळा बनाव तिने का रचला, त्या मागचं कारण काय हे ऐकल्यावर पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला.

रचत स्वत:च स्वत:ला बांधून घेतलं आणि…

हे सुद्धा वाचा

सावंतवाडी रोणापाल-सोनुर्ले येथील जंगलात एक अमेरिकन महिला सापडली होती. ललिता कायी कुमार एस असं तिचं नाव आहे. या महिलेला साखळदंडाने करकच्चून बांधून जंगलात सोडण्यात आले होते. एका गुराख्याला ती जुला महिन्याच्या अखेरीस सापडली तेव्हा तिची अवस्था अतिशय बिकट होती. पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले पण पीडित महिला अशक्त असल्याने तिला काही बोलता येत नव्हतं. थोड्या काळाने तिने दिलेल्या जबाबावरून तिच्या नवऱ्याच्या दिशेने संशयाची सुई फिरली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता.

तिचा नवरा तामिळनाडूत असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी तसा तपास सुरू केला तर दुसरीकडे त्या महिलेचीही कसून चौकशी सुरू होती. रत्नागिरीतल्या मनोरुग्णालयात तिच्यावर उपचारही सुरू होते. तिच्या नवऱ्याचा काहीच पत्ता लागेना तेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या महिलेची पुन्हा चौकशी केली. अखेर तिने जी कबुली दिली ते ऐकून सर्वच हादरले.

पैसे संपल्याने रचला बनाव

ललिता या महिलेनेन दिलेल्या कबुलीनुसार, अमेरिकन महिलेनेच हा बनाव रचल्याचं उघड झालं. ललिता कुमार ही मूळची अमेरिकेची असून काही काळापासून भारतात रहात होती. मात्र अमेरिकन विझाची मुदत संपल्याने आणि अमेरिकेतून पुरेसे पैसे येत नसल्याने तणावातून जीवन संपवण्यासाठी आपण स्वतःला बांधून घेतल्याची कबूली ललिता यांनी दिली. त्यांनी मनोरुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकिय अधिकाऱ्याला माहिती दिली. बांदा पोलिसांनी सुद्धा या संदर्भातील जवाब पुर्ण केला आहे.

सदर महिला योग शिक्षिका असून तिला उपाशी रहायची आहे. पैसे नसल्याने जीवन संपवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं. जंगलात उपाशी राहून ती मृत्यूची वाट पहात होती, असंही तिने सांगितलं. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.

काय आहे प्रकरण ?

जुलै महिन्याच्या अखेरीस सावंतवाडीमधील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळी बांधलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिला आढळली होती. ललिता कायी कुमार एस हिला उपचारांसाठी पोलीस बंदोबस्तात गोवा बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले. मूळची अमेरिकेतील असलेली ललिता ही काही काळापासून तामिळनाडूत रहात होती.

ती रोणापाल जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना आढळली. सावंतवाडी व बांदा पोलिसांनी या महिलेला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ते यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेले 40 दिवस ती उपाशी असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक आणि चुकीची औषधे दिल्याचा दावा तिने केला होता. तसेच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याचेही तिने सांगितले होते. अन्न न मिळाल्याने ती विदेशी महिला अशक्त बनली होती. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.