Groom death | घरात आनंदाच वातावरण होतं. लग्नाचा उत्साह होता. लगबग सुरु होती. 26 फेब्रुवारीला टिळा लावण्याचा कार्यक्रम आणि 2 मार्चला लग्न होतं. कुटुंबीय लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. या दरम्यान अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली. सदर युवक पीएचडी विभागात शहीद भवन येथील पाणी टाकीवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. बिहारच्या आरामधील मुफस्सिल पोलीस ठाणे क्षेत्रात एका युवकाची हत्या झाली. त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच, त्या भागातील लोक संतप्त झाले. त्यांना रुग्णालयाजवळचा रस्ता रोखून धरला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
शोभी डुमरा गावाजवळ ही हत्या झाली. आरोपींनी दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष गोळ्या झाडून युवकाची हत्या केली. अभिषेक उर्फ अंगद कुमार (27) असं मृत व्यक्तीच नाव आहे. लग्नाच्या घरात अभिषेकच्या मृत्यूची बातमी येताच महिलांनी हंबरडा फोडला. आनंदाच वातावरण दु:खामध्ये बदलून गेलं. या हत्येमुळे खवळलेल्या परिसरातील लोकांनी रस्ता जाम केला. आरा सदरचे एसडीओपी परिचय कुमार आणि मोठ पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. कसंतरी संतप्त लोकांना समजावून तिथून हटवलं.
दुपारी 3 वाजता कॉल आल्यानंतर बाहेर पडला
मृत अभिषेकचा मोठा भाऊ हरेंद्र ऊर्फ डोमा यादव म्हणाला की, “दुपारी 3 वाजता कॉल आल्यानंतर माझा भाऊ घरातून निघाला. काहीवेळा पुन्हा कॉल आला, त्यावर माझ्या भावाची गोळी मारुन हत्या करण्यात आल्याच समोरच्याने सांगितलं. कुटुंबाच किंवा त्याच कोणाबरोबरही शत्रुत्व नव्हतं” आरा सदरचे एएसपी परिचय कुमार यांनी सांगितलं की, “हत्येच कारण अजून समजलेलं नाहीय. पोलीस चौकशी सुरु आहे. लवकरच आरोपीला पकडण्याच येईल”