Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना झाल्याच्या रागातून पत्नीची हत्या, स्टेशन मास्तर पतीची आत्महत्या

कोरोनाची लागण झाल्यावरुन तुलिका आणि पती अतुल यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात अतुल यांनी पत्नीची गळा आवळून हत्या केली (Bihar Husband kills COVID Wife )

कोरोना झाल्याच्या रागातून पत्नीची हत्या, स्टेशन मास्तर पतीची आत्महत्या
कोरोनाग्रस्त पत्नीची गळा आवळून हत्या
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 11:47 AM

पाटणा : कोरोनाग्रस्त पत्नीची हत्या करुन रेल्वे अधिकारी पतीनेही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. पती अतुल लाल हे बिहारमध्ये स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. (Bihar Crime Husband kills COVID Positive Wife later commits Suicide)

पत्नीची गळा आवळून हत्या

बिहारची राजधानी पाटणा शहरात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तुलिका लाल यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची लागण झाल्यावरुन तुलिका आणि पती अतुल यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात अतुल यांनी पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन अतुल यांनी उडी घेतली.

पाटण्यातील पत्रकार नगरमधील ओम रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. अतुल आणि तुलिका यांच्या नातेवाईकांनी पत्रकार नगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरु केला.

पत्नीला कोरोना झाल्यावरुन वाद

पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने अतुल लाल त्रस्त होते. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली होती. त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अतुल लाल हे पाटणा जंक्शनला स्टेशन मास्तर होते.

कोरोनाग्रस्त पतीच्या निधनानंतर पत्नीची आत्महत्या

एकीकडे कोरोनाग्रस्त पत्नीला संपवल्याची घटना समोर आली आहे, तर काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली होती. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं होतं. (Bihar Crime Husband kills COVID Positive Wife later commits Suicide)

दुसऱ्या पतीकडून हत्या

सोलापुरात राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेची दुसऱ्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पहिल्या पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून महिलेने दुसरा विवाह केला होता. मात्र क्षुल्लक वादातून दुसऱ्या पतीने तिला जीवे मारलं. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथील उपळाई रोड येथे राहणाऱ्या रुकसार अलीम मुलाणी या 28 वर्षीय महिलेची रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी याने हत्या केली होती.

संबंधित बातम्या :

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

पाटील दाम्पत्याच्या हत्येचं गूढ पाच दिवसात उकललं, महिलेसह तिघांना अटक

(Bihar Crime Husband kills COVID Positive Wife later commits Suicide)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.