विवाहित प्रेयसीसोबत पळून जाताना रंगेहाथ पकडलं, गावकऱ्यांची प्रियकराला अघोरी शिक्षा

विवाहित प्रेयसीला प्रियकराने तिच्या सासरहून पळवून नेले. महिलेच्या सासरी याची कुणकुण लागताच त्यांनी ग्रामस्थांसोबत दोघांची शोधाशोध सुरु केली (Married Girlfriend beaten up with Boyfriend)

विवाहित प्रेयसीसोबत पळून जाताना रंगेहाथ पकडलं, गावकऱ्यांची प्रियकराला अघोरी शिक्षा
विवाहित महिलेला प्रियकरासोबत पळून जाताना पकडलं
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 10:57 AM

पाटणा : विवाहित प्रेयसीसोबत पळून जाताना गावकऱ्यांनी प्रियकराला पकडलं. त्यानंतर युगुलाला अघोरी शिक्षा देण्यात आली. युवकाला झाडाला बांधून त्याचं मुंडण करण्यात आलं. त्यानंतर त्याला बेदम चोपही देण्यात आला. या प्रकाराचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. बिहारमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वच हैराण झाले आहेत. (Bihar Crime Married Girlfriend beaten up by villagers when caught with Boyfriend)

प्रेमी युगुलाला पेट्रोल पंपावर पकडलं

बिहारमधील समस्तीपूरमध्ये बिथान भागातील सोहमा गावात ही घटना घडली. विवाहित प्रेयसीला प्रियकराने तिच्या सासरहून पळवून नेले. महिलेच्या सासरी याची कुणकुण लागताच त्यांनी ग्रामस्थांसोबत दोघांची शोधाशोध सुरु केली. बाईकमध्ये पेट्रोल भरायला गेले असताना हे युगुल गावकऱ्यांच्या हाती लागलं.

बेदम चोप देऊन तरुणाचं मुंडन

गावकऱ्यांनी प्रेयसी आणि प्रियकराला खेचून पुन्हा सोहमा गावात आणलं. त्यानंतर दोघांना बेदम चोप दिला. मात्र गावकऱ्यांचा राग इतक्यावर शांत झाला नाही. त्यांनी प्रियकराला झाडाला बांधून त्याच्या चेहऱ्याला चुना फासला. त्यानंतर त्याचं मुंडनही केलं. 19 मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ गावात व्हायरल झाला.

बुलडाण्यात मुलीच्या प्रियकराला जीवघेणी मारहाण

दरम्यान, रात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसल्याने तिच्या कुटुंबियांनी प्रियकराला बेदम मारहाण केल्याची घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रापूर तालुक्यातील सावळा गावात प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला होता.

जालन्यात विधवा सूनेसह प्रियकराची हत्या

विधवा सुनेच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याने सून आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटनाही गेल्या वर्षी जालन्यात घडली होती. सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रियकराने मृत्यूपूर्वी जखमी अवस्थेत असताना आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं बिंग फुटलं होतं. या प्रकरणी सासरा आणि त्याच्या दुसऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

संबंधित बातम्या :

लग्न झालेल्या प्रेयसीसोबत बेडरुममध्ये प्रियकर, तितक्यात नवरा दारात, पुढं जे घडलं त्यानं भंडारा हादरला

लिव्ह इन संबंधातून मूल, तरी पहिल्या नवऱ्याला घटस्फोटास नकार, तरुणाकडून विवाहित प्रेयसीची हत्या

(Bihar Crime Married Girlfriend beaten up by villagers when caught with Boyfriend)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.