प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल

आरोपी साजनच्या पत्नीचे रुपेश नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याविषयी समजताच साजन चांगलाच भडकला. रागाच्या भरात त्याने रुपेशला जीवे ठार मारण्याचा कट रचला. त्याने भावासोबत कट रचून रुपेशला अमझोर डोंगरावर बोलावले.

प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 8:04 AM

पाटणा : लव्ह मॅरेज केल्यानंतरही पहिल्या प्रियकराशी पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair) सुरुच होते. याची कुणकुण लागल्यानंतर चिडलेल्या नवऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने रागाच्या भरात आधी पत्नीच्या प्रियकराचे (Boyfriend) हात पाय बांधले, त्यानंतर त्याचा गळा चिरला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. बिहारमधील (Bihar Crime) मुंगेर येथे 24 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. या ठिकाणी स्थानिकांनी तरुणाला गंभीर अवस्थेत पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली. धरहरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमी तरुणावर प्रथमोपचार करुन त्याला पाटणा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी साजनच्या पत्नीचे रुपेश नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याविषयी समजताच साजन चांगलाच भडकला. रागाच्या भरात त्याने रुपेशला जीवे ठार मारण्याचा कट रचला. त्याने भावासोबत कट रचून रुपेशला अमझोर डोंगरावर बोलावले.

नवरा आणि दीराने तरुणाचा गळा चिरला

रुपेश तिथे पोहोचताच दोघांनी त्याचे हात-पाय बांधून गळा चिरला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर रुपेश कसाबसा डोंगरावरुन खाली उतरला. सुदैवाने त्याला जखमी अवस्थेत पाहून काही जणांनी पोलिसांना कळवले.

कागदावर नावं लिहिली

गंभीर जखमी झालेला रुपेश काही बोलू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्याने कागदावर साजन आणि सागर यांची नावे लिहून संपूर्ण घटनाक्रम कथन केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली.

अनैतिक संबंध असल्याचा संशय

त्याचवेळी दोन्ही भावांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. आपला प्रेमविवाह झाल्याचे आरोपी साजनने पोलिसांना सांगितले. तरीही त्याची पत्नी तिचा एक्स बॉयफ्रेण्ड रुपेशशी बोलायची आणि दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

मेहुणीला लग्नाचं वचन, बायकोचा मर्डर, महिला पोलिसांशी अनैतिक संबंध, स्त्रीलंपट नवऱ्याला अटक

रात्री नवरा अचानक घरी, पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, एकही शब्द न बोलता नवऱ्याने…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.