भावाच्या लग्नात बहिणीच्या संसाराला गालबोट, भावोजींची गोळी झाडून हत्या

बिहारमधील औरंगाबादमध्ये बुधवारी रात्री उशिरा मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील मंजुराही गावात मेहुण्याच्या टिळा समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या त्याच्या मेव्हण्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

भावाच्या लग्नात बहिणीच्या संसाराला गालबोट, भावोजींची गोळी झाडून हत्या
मेहुण्याच्या लग्नात भावोजींची हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 3:19 PM

पाटणा : बिहारमध्ये (Bihar Crime News) सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे. राज्यातील प्रत्येक भागात लग्न सोहळे होत आहेत. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मेहुण्याच्या लग्नापूर्वी (Brother in law) टिळा समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या दाजींची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. गाडी मागे घेण्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

बीएड महाविद्यालयाच्या संचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवाच्या मेहुण्याची हत्या झाल्याची बातमी समजताच खळबळ उडाली. घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात रुपांतरित झाले. भावाच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आलेल्या बहिणीच्या आनंदाला क्षणार्धात गालबोट लागलं.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील औरंगाबादमध्ये बुधवारी रात्री उशिरा मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील मंजुराही गावात मेहुण्याच्या टिळा समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या त्याच्या मेव्हण्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

गाडी मागे घेण्यावरुन दोघांमध्ये वाद

मयत संजीत कुमार हा अरवाल जिल्ह्यातील पारसी पोलीस स्टेशन हद्दीतील बहादूरपूर गावचा रहिवासी होता. राजमुनी देवी बीएड कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार सिंग उर्फ ​​बबलू सिंग याच्यावर हत्येचा आरोप आहे. गाडी मागे घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचा दावा केला जातो.

बबलू सिंगने संजीत यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र, अटकेनंतरही आरोपीने या प्रकरणातून आपले नाव वगळण्यासाठी पोलीस ठाण्यात वारंवार फोन केल्याने मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाजवळ मृतदेह ठेवून जुना जीटी रोड रोखून धरला. पोलिसांच्या तपासावर कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.