बायकोच्या हत्या प्रकरणात नवऱ्याला तुरुंगवास, नऊ वर्षांनी विवाहिता जिवंत समोर

ज्या महिलेच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पतीने तुरुंगवास भोगला होता, ती बाजारात फिरताना सापडली. पती विजय कुमारच्या दाव्यानुसार पत्नी उषा कुमारी नऊ वर्षांपूर्वी अचानक कुठेतरी निघून गेली होती.

बायकोच्या हत्या प्रकरणात नवऱ्याला तुरुंगवास, नऊ वर्षांनी विवाहिता जिवंत समोर
बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावरImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 12:27 PM

पाटणा : 9 वर्षांपासून बेपत्ता (Missing Lady) असलेली विवाहिता अचानक तिच्या सासरच्या मंडळींना बाजारात भेटल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. महिलेचे अपहरण आणि हत्या (Kidnap and Murder) केल्याच्या आरोपाखाली पतीने तीन महिन्यांची शिक्षाही भोगली होती. महिलेच्या माहेरच्यांनी पती, सासू आणि दीर यांच्यावर हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. बिहारमधील गया शहरात (Bihar Crime) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे प्रकरण?

गयामधील मुफस्सिल पोलीस ठाण्याअंतर्गत अबगिलामध्ये ही घटना घडली. ज्या महिलेच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पतीने तुरुंगवास भोगला होता, ती बाजारात फिरताना सापडली. पती विजय कुमारच्या दाव्यानुसार पत्नी उषा कुमारी नऊ वर्षांपूर्वी अचानक कुठेतरी निघून गेली होती. त्याआधीही ती अनेक वेळा घरातून पळून गेली होती. मात्र बहुतांश वेळा ती पाटण्यातील मीठापूर येथे असलेल्या माहेरी जायची.

माहेरच्यांकडून हत्या-अपहरणाचा गुन्हा

एकदा गेलेली पत्नी परत आलीच नव्हती. खूप शोधाशोध केल्यानंतरही कुठलेच पुरावे सापडले नव्हते. त्यामुळे उषाच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती विजय कुमार, दीर रणजीत कुमार आणि सासूच्या विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. 2013 मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी पती विजय कुमारला तुरुंगातही धाडलं होतं. तीन महिने शिक्षा भोगल्यानंतर तो परत आला होता.

नणदेने वहिनीला बाजारात पाहिलं

पती विजय मिस्त्री म्हणून काम करतो. पोलिसांनी तपासाअखेर त्याचं नाव केसमधून वगळलं. तर सासूला हायकोर्टातून जामीन घ्यावा लागला होता. मात्र हे प्रकरण अजूनही कोर्टात सुरु आहे. दीर रणजीतने सांगितलं, की आमची बहीण एके संध्याकाळी दूध आणायला बाजारात गेली होती. तेव्हा नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या वहिनीला पाहून ती चकित झाली. तिने घरी येऊन आम्हाला सांगितलं. त्यामुळे विजय आणि कुटुंबीय उषाच्या माहेरी गेले. मात्र तिने दुसरं लग्न करणार असल्याचं सांगत सासरी येण्यास नकार दिला. त्यामुळे विजयने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता उषाला ताब्यात घेण्यात आलं.

एखादी महिला सात वर्ष सापडली नाही, तर तिला मृत समजले जाते. संबंधित महिला नऊ वर्षांनी परतल्याने तत्कालीन साक्षींच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. खोटी केस करणाऱ्या महिलेच्या माहेरच्या माणसांवरही कारवाई होईल, असं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

नागपुरात 23 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, शेजारी पेट्रोलची रिकामी बाटली

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.