सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बहाण्याने ऑर्केस्ट्रा गायिकेला बोलावलं, खोलीत कोंडून तिघांकडून गँगरेप

रामकृष्ण नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योती बाबा पथ येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केली आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बहाण्याने ऑर्केस्ट्रा गायिकेला बोलावलं, खोलीत कोंडून तिघांकडून गँगरेप
ऑर्केस्ट्रा गायिकेवर बलात्कारImage Credit source: ट्विटर
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 11:52 AM

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील (Bihar Crime News) मॅरेज गार्डनमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमात गाणे गाण्याच्या बहाण्याने बोलावून ऑर्केस्ट्रा गायिकेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्काराची ही घटना रामकृष्ण नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तिघा तरुणांनी एका गायिकेला सांस्कृतिक कार्यक्रमात गाण्यासाठी बोलावले आणि नंतर बंद खोलीत नेऊन तिघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित गायिका कशीबशी त्यांच्या तावडीतून निसटली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली.

काय आहे प्रकरण?

रामकृष्ण नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योती बाबा पथ येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केली आहेत.

नेमकं काय घडलं?

पाटण्यातील जेहानाबादची रहिवासी असलेली 28 वर्षीय तरुणी मिठापूर भागात राहून सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी गात तिच्या कुटुंबाला उदरनिर्वाहात हातभार लावते. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण नगर येथील रहिवासी पिंटू कुमार, संजीव कुमार आणि कालू कुमार यांनी तिला एका लग्नमंडपात गाणे गाण्यासाठी बुक केले होते.

हे सुद्धा वाचा

गायिका तिथे पोहोचली तेव्हा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याचे पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र तिला काही समजण्याआधीच तीन तरुणांनी तिला बळजबरीने उचलून खोलीत नेले आणि नंतर गँगरेपची घटना घडवून आणली. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून लग्न मंडपातील तीन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त केली आहेत. पाटणाचे एसएसपी एमएस ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे आधीपासूनच एकमेकांच्या ओळखीचे होते आणि या बहाण्याने सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. पाटणा एसएसपी म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाचा खटला वेगवान पद्धतीने चालवला जाईल जेणेकरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊ शकेल.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.