माजी भाजप आमदाराच्या दोघा सख्ख्या भावांची गोळ्या झाडून हत्या! दुहेरी हत्याकांडानं बिहार हादरलं

Bihar Double Murder : गँगवॉरने शंभू शरण आणि गौम सिंह या दोघांची हत्या करण्यात आली. शंभू चरणचं वय 32 तर गौतम सिंहचं वय 28 वर्ष होतं.

माजी भाजप आमदाराच्या दोघा सख्ख्या भावांची गोळ्या झाडून हत्या! दुहेरी हत्याकांडानं बिहार हादरलं
दुहेरी हत्याकांडानं बिहर हादरलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 8:36 AM

बिहार दुहेरी हत्याकांडाच्या (Bihar Double Murder Case) घटनेनं हादरुन गेलंय. भाजपच्या माजी आमदाराच्या (Ex BJP MLA Brother Murder) दोघा भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघा सख्ख्या भावांच्या हत्येनं बिहारमध्ये खळबळ माजली आहे. यातील एक जण सीए होता तर दुसरा एका वेब पोर्टलमध्ये पत्रकार म्हणून काम करत होता. या घटनेनंतर परिसरात तणाव पाहायला मिळतोय. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास (Police Investigation on) केला जातोय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसएसपी मानव जीत सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दोन गटात झालेल्या वर्चस्ववादाच्या लढाईतून गँगवॉर झालं. यातूनच हे दुहेरी हत्याकांड घडलं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांच्या दोघा भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी हे हत्याकांड गँगवॉरचा प्रकार असल्याचं म्हटलंय. बिहारच्या पाटणा मध्ये मंगळवारी (31 मे) संध्याकाळी ही खळबळजनक घटना घडली.

अधिक तपास सुरु

बिहारच्या पाटणा पोलिसांकडून या दुहेरी हत्याकांडप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. गँगवॉरने शंभू शरण आणि गौम सिंह या दोघांची हत्या करण्यात आली. शंभू चरणचं वय 32 तर गौतम सिंहचं वय 28 वर्ष होतं. या हत्याकांडामध्ये संजय सिंह याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. चार दिवसांपूर्वी संजय सिंह यांच्या निकटवर्तीय सुधीर शर्मा यांची जबर मारहाण करत हत्या करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी भाजपच्या माजी आमदाराचं किंवा त्यांच्याशी संबंधित कुणाचंही नाव घेण्यात आलं होतं. आता चार दिवसांनंतर हे खळबळजनक हत्याकांड समोर आलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : महत्त्वाची बातमी

घरी परतत असताना हल्ला

बाईकवर शंभू शरण आणि गौतम हे घरी परतत होते. गौतम बाईक चालवत होता. त्यानं हेल्मेटही घातलेलं. दरम्यान, कालीमंदिरापासून पुढे येताच बाईकवर आलेल्या दोघांनी गौतम आणि शंभू शरणवर गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली. या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघांच्या डोक्यात आणि चेहख्यावर पॉईंट ब्लॅक रेंजवरुन प्रत्येकी तीन तीन गोळ्या झाडण्यात आल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.