तरुण परदेशातून आला, घरी लग्नाची तयारी, पोलिस घरी आले अन् सगळे ढसाढसा रडले
नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, निकेश कुमार रात्री घरातून अचानक गायब झाला होता. त्यानंतर तो घरी आला नाही. शुक्रवारी कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी खूप शोधाशोध केली.
गोपालगंज : परदेशात कामानिमित्त असलेला तरुण घरी परतला, घरच्यांनी लग्नाची तयारी केली. पैपाहुणे जमले सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या (Gopalganj News). लग्नाच्या आदल्या दिवशी गायब झालेला तरुण घरी परतला नाही. त्याचा शोध नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी घेतला. ज्यावेळी पोलिस (Bihar police) नवरदेवाच्या घरी आले त्यावेळी मंडपात उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ही घटना बिहार (bihar crime news) राज्यातील असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून कुटुंबियांची कसून चौकशी होणार असल्याची माहिती दिली आहे.
पोलिसांना संशय असल्यामुळे हत्या आणि आत्महत्या याची चौकशी करण्यात येणार आहे
लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाने रेल्वेच्या पटरीवरती मुलाचा मृतदेह सापडल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. विशेष म्हणजे ज्या दिवशी पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह सापडला त्याचदिवशी त्याचं लग्न होणार होतं. पोलिसांना संशय असल्यामुळे हत्या आणि आत्महत्या याची चौकशी करण्यात येणार आहे. मुलाच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असून गावात सुद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नाच्या दिवशी मिळाला मृतदेह
सुंदर पट्टी गावातील निकेश कुमार याचा मृतदेह सापडल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. तरुणाच्या मृत्यूचं कारण शोधण्यात पोलिस व्यस्त आहे. मुलगा परदेशातून लग्न करण्यात आला होता. ज्या दिवशी त्या मुलाचा मृतदेह सापडला, त्याच दिवशी त्याचं लग्न होतं अशी माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
रात्रीपासून तरुण गायब होता
नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, निकेश कुमार रात्री घरातून अचानक गायब झाला होता. त्यानंतर तो घरी आला नाही. शुक्रवारी कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी खूप शोधाशोध केली. पण तरुणाचा काही शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेच्या ट्रकवर तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली.