नाव बदलून तो महिलांशी ठेवायचा संबंध, नंतर व्हिडीओ दाखवून करायचा ब्लॅकमेल, अखेर पोलिसांनी केली अटक

| Updated on: May 30, 2023 | 2:50 PM

नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आणि जमिनीचा वाद मिटवतो असे सांगत तरुणाने दोन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी अवैध संबंध केले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग सुरू केले.

नाव बदलून तो महिलांशी ठेवायचा संबंध, नंतर व्हिडीओ दाखवून करायचा ब्लॅकमेल, अखेर पोलिसांनी केली अटक
Follow us on

पाटणा : बिहारमधील मोतिहारीमध्ये एका तरुणावर नाव बदलून हिंदू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा (fraud) आणि त्यांचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल (blackmail) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा तरुण स्वत:ला हिंदू ब्राह्मण सांगून महिलेच्या संपर्कात आला. एवढेच नाही तर हा तरुण आपण एका वृत्तपत्राचा संपादक असल्याचे सांगतो. पोलिसांनी त्याच्याकडून दोन आधार कार्ड जप्त केले आहेत. एका आधारावर त्याचे नाव निशांत राज, वडीलांचे नाव राजबाबू, पत्ता राजेंद्र नगर मोतिहारी आहे तर दुसऱ्या आधार कार्डमध्ये त्याचे नाव निशांत रेजा, वडील – मोहम्मद मोतीउर रहमान, पत्ता – चक लालू मेहसी आहे. यासोबतच त्याच्याकडून दोन चारित्र्य प्रमाणपत्रही मिळाले आहेत.

निशांत रजा नावाच्या मुस्लीम तरुणाने स्वतः हिंदू ब्राह्मण असल्याची बतावणी करून तिच्या घरात भाड्याने राहायला सुरुवात केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यादरम्यान त्याने कसातरी आमचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि आमच्यावर लैंगिक अत्याचार सुरू केला. हा तरुण स्वतःला वृत्तपत्राचा संपादकही म्हणवून घेत असे, असेही त्या महिलेने सांगितले.

अनेक महिलांचे आपत्तीजनक व्हिडीओ मिळाले

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तरुणाला अटक केली असता त्याच्याकडे दोन आधारकार्ड आणि दोन चारित्र्य प्रमाणपत्र सापडले. एका आधार कार्डवर निशांत राज आणि दुसऱ्यावर निशांत रजा असे त्याचे नाव आहे. यासोबतच त्याच्या मोबाईलमधून अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओही मिळाले. हिंदू तरुण असल्याचे भासवून तो हिंदू तरुणी आणि महिलांना फसवत असे आणि नंतर अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असे. सध्या तो ज्या घरात हिंदू म्हणून राहत होते ते घर एका लष्करी जवानाचे आहे. जिथे दोन विधवा महिला राहत होत्या.

अनेक महिलांना फसवलं

याठिकाणी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आणि जमिनीचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने त्याने दोन्ही महिलांना विश्वासात घेऊन अवैध संबंध प्रस्थापित केले आणि नंतर त्यांचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या दोन्ही महिला नात्यात सासू आणि सून आहेत. महिलेच्या लहान मुलाला हा प्रकार कळताच त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर त्या आरोपीला अटक करण्यात आली.

इकडे निशांतला अटक केल्यानंतर एक तरुणी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली होती. ती मुलगी त्याची प्रेयसी असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा तिला पोलिस स्टेशनमध्ये त्याचे सत्य समजले तेव्हा ती रडतच परत गेली. मोतिहारीच्या एसपींनी सांगितले की, तरुणांच्या नावावर दोन आधार कार्ड आणि दोन चारित्र्य प्रमाणपत्रे मिळाली आहेत. यासोबतच फसवणूक करून अवैध संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.