मुलीच्या हृदयात होल, घरात अठराविश्व दारिद्र्य, इलाजासाठी पैसे नाही, मग जे घडले ते काळीज पिळटवटून टाकणारे !

जन्मताच अडीच वर्षाच्या मुलीच्या हृदयाला होल होता. आधीच घरात अठराविश्व दारिद्य असूनही पित्याने कर्ज करुन मुलीचा इलाज केला. मात्र दोन वेळचे अन्न मुश्किलीने मिळवणाऱ्या पित्याला मुलीचा पुढचा इलाज शक्य नव्हते, यामुळे पित्याने जे केले ते भयंकर होते.

मुलीच्या हृदयात होल, घरात अठराविश्व दारिद्र्य, इलाजासाठी पैसे नाही, मग जे घडले ते काळीज पिळटवटून टाकणारे !
इंजेक्शन दिल्याने दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यूImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 10:54 PM

पाटणा : बिहारमधील पाटणामध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या अडीच महिन्यांच्या मुलीला मृत्यूच्या दाढेत लोटल्याची घटना घडल्या आहेत. कदमकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काजीपूर येथे ही घटना घडली. मुलीच्या हृदयाला होल होता. आधीच मुलीच्या इलाजामुळे कर्जबाजारी झालेल्या बापाकडे तिच्या पुढील उपचारासाठी पैसे नव्हते. यामुळे बापाने स्वतःच्या जन्मदात्या मुलीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह डब्यात भरुन ठेवला. मुलगी दिसत नसल्याने पत्नीने कांगाव केला आणि पोलिसांना माहिती दिली. यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या आधीच बाप पकडला गेला. अभय यादव असे आरोपी पतीचे नाव आहे.

मुलीच्या इलाजासाठी पैसे नव्हते

अभय यादव अंडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अभयच्या अडीच महिन्यांच्या मुलीच्या हृदयात छिद्र होते. यामुळे त्याने तिच्यावर अनेक डॉक्टरांकडून इलाज केला होता. पण तिच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. मुलीच्या इलाजामुळे अभयवर आधीच दीड लाखाचे कर्ज झाले होते. आधीच गरीबीने बेजार असलेल्या अभयला पुढील इलाज करणे शक्य नव्हते. आर्थिक चणचण आणि कर्ज यामुळे अभय पत्नी बाथरुममध्ये जाताच मुलीची हत्या केली आणि मृतदेह डालड्याच्या डब्यात भरुन किचनमध्ये ठेवला.

पत्नीने पोलिसात धाव घेतल्याने घटना उघड

पत्नी बाथरुममधून बाहेर आल्यानंतर तिला मुलगी दिसली नाही. म्हणून तिने शोधाशोध सुरु केली. अभयने पत्नीसोबत मुलीला शोधण्याचे नाटक केले. यानंतर पत्नीने कुटुंबीयांसोबत पोलीस ठाणे गाठत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता मुलगी घरातच डालड्याच्या डब्यात मृतावस्थेत आढळली. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे बापाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.