शेतात गुप्तपणे 10 चाकांचा ट्रक उभा होता, गावकऱ्यांचं दुर्लक्ष, पोलीस पोहोचताच उघडलं रहस्य
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी दारू तस्करी पकडली आहे. सकरा, मोतीपूर आणि साहेबगंजमध्ये मोठ्या प्रमाणात दारू आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. अनेक तस्करांना अटक झाली आहे. सकरात एका ट्रकमध्ये लपवलेली दारू सापडली, तर मोतीपूर आणि साहेबगंजमध्येही दारू आणि वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी तस्करांच्या नेटवर्कचा शोध घेत आहे.

बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील पोलिसांनी मद्य तस्करांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. सकरा, मोतीपूर आणि साहेबगंजमधील वेगवेगळ्या घटनांमद्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर दारू जप्त केली आहे. अनेक तस्करांना अटकही केली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून मद्य तस्करीचं हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
सकरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील विशुनपूर बघनगरी गावात पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस ट्रक आढळला. एका शेतात हा ट्रक उभा होता. 10 चाकी हा ट्रक होता. पोलिसांनी हा ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा ट्रक पोलिसांनी जप्त करून पोलीस स्टेशनला नेला असून पुढील कारवाई सुरू आहे.
ट्रकचा वापर मद्याच्या तस्करीसाठी
या ट्रकचा वापर मद्याची तस्करी करण्यासाठी येत होता असा पोलिसांना संशय आहे. तस्करीतून आणलेल्या दारूची खेप वाटताना घाबरून हे लोक पळून गेले असतील. ट्रकमध्ये दारू लपण्यासाठी एक गुप्त जागा बनवली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून मद्य तस्करांचा शोध सुरू केला आहे. ट्रक पकडण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आण्ही ट्रक जप्त केला आहे. शेताच्या मालकाची ओळख पटवून कारवाई करण्यात येणरा असल्याचं पोलीस ठाण्याचे अधिकारी राजू कुमार पाल यांनी सांगितलं.
दारू आणि बाइक
दरम्यान, मोतीपूर पोलिसांनी 51 लीटर देशी दारूसह एका तस्कराला अटक केली आहे. राजेपूर पोलिसांनी दोस्तपूर गावात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तस्कराचं नाव मंजूर अली आहे. तो परसौनी रईसी येथील रहिवाशी आहे. बाइकवरून दारू घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी बाइक आणि दारू दोन्ही ताब्यात घेतले आहेत. मंजूर अली बऱ्याच काळापासून दारूची तस्करी करत होता. सूचना मिळताच आम्ही कारवाई करून त्याला अटक केली. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांचं यश
साहेबगंज पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. बायपास पुलाजवळ एका बोलेरो गाडीतून 243.64 लीटर विदेशी मद्य पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तस्कराचं नाव नीरज कुमार आणि विकास कुमार आहे. दोघेही हाजीपूरचे राहणारे आहेत.