Bihar : भ्रष्टाचाराचा कळस, पोटच्या गोळ्याचा मृतदेह सोडवून घेण्यासाठी बाप दारोदारी, पोस्टमार्टम करणाऱ्यानं 50 हजार मागितले !
पोलिसांना एक मृतदेह सापडला असल्याची माहिती मुलाच्या वडिलांना मिळाली. त्यांनी जवळ असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये तात्काळ धाव घेतली. त्यावेळी त्यांना तो मृतदेह आरोग्य विभागाच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात आले.
बिहार – बिहारमध्ये (Bihar) एक लज्जास्पद असा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या मृत्यूने व्याकूळ झालेल्या पित्याकडे शवविच्छेदन करणाऱ्या लोकांनी लाच मागितली आहे. असमर्थ असलेल्या बापाने मृतदेह वारंवार मागितला. परंतु पन्नास हजार रूपये घेऊन या असं सांगण्यात आलं. ही घटना डोळ्यात पाणी आणणारी आहे. खिशात पैसे नसल्याने मुलांच्या बापाने थेट लोकांच्याकडे भीक मागायला सुरुवात केली आहे. बिहार राज्यातील समस्तीपरू (Samstipur) जिल्ह्यात कस्बे आहार गावात ही घटना घडली आहे. ज्यावेळी लोकांना भीक मागण्याचं कारण समजलं त्यावेळी लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मुलाच्या पिताचं नाव महेश ठाकूर आहे, त्यांचा मुलगा काही दिवसांपासून गायब होता. अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही सापडला नसल्याने त्यांच्या वडिलांनी पोलिस (police) ठाण्यात मुलगा गायब असल्याची तक्रार दिली होती. हे प्रकरण ज्यावेळी रूग्णालयात समजलं त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. आता या प्रकरणावरती प्रशासन काय निर्णय घेणार याकडे बिहार वासीयांचं लक्ष लागलं आहे.
मुलाचा मृतदेह दाखवायला देखील नकार
पोलिसांना एक मृतदेह सापडला असल्याची माहिती मुलाच्या वडिलांना मिळाली. त्यांनी जवळ असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये तात्काळ धाव घेतली. त्यावेळी त्यांना तो मृतदेह आरोग्य विभागाच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी आरोग्य विभाग गाठलं. तिथं त्यांना मृतदेह दाखवला नाही. मुलाचे वडिलांनी त्यांना हात-पाय जोडल्यानंतर मृतदेह दाखवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पन्नास हजाराची केली मागणी
ज्यावेळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी मुलांच्या बापाकडे तिथल्या कर्मचाऱ्याने तब्बल पन्नास हजार रूपये मागितले. त्यावेळी पित्याने माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. तसेच मृतदेह वारंवार मागितला, पण मृतदेह पैसे दिल्याशिवाय देणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पित्याने आपल्या मुलाच्या मृतदेहासाठी भीक मागायला सुरूवात केली. पित्यासोबत मुलाची आई देखील भीक मागत होती. ज्यावेळी ही माहिती रूग्णालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना समजली तेव्हा त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे.
तसेच त्यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी व्हायला हवी असं देखील म्हटलं आहे.