बिहार : बिहारमधील सारण जिल्ह्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीला मिळून पाच जणी मारहाण करताना दिसून आल्यात. या व्हिडीओबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. प्रियकरासोबत झालेल्या वादातून हा राडा झाल्याचं सांगितलं जातंय. नेमका हा वाद काय होता, यावरुनही तर्क वितर्कांना उधाण आलंय.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीला मिळून पाच जणी जबरदस्त चोप देताना दिसून आल्या आहेत. कुणी या मुलीचे केस ओढतंय. कुणी तिला ढोसे हाणतंय, कुणी लाथा घालतंय. तर कुणी तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करतंय.
या दरम्यान एक मुलगा या मुलीला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना देखील दिसून आला आहे. पण तरिही या मुलीला मारहाण करणं सुरुत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलंय.
हा व्हिडीओ एका जत्रेतील असल्याचं बोललं जातंय. सोनपूर येथे एका जत्रेचं आयोजन करण्यात आलं. या जत्रेच तरुणींची झालेली फ्री स्टाईल हामामारी चर्चेत आली आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या तरुणीला मारहाण करण्यात आली, ती एका दुसऱ्याच मुलीच्या प्रियकरासोबत जत्रेत फिरत होती. या जत्रेत त्या मुलीला आणि प्रियकराला रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यानंतर तुफान राडा झाला.
पाच मैत्रिणी एकत्र आल्या, त्यांच्यापैकी एकीचा बॉयफ्रेन्ड भलत्याच मुलीसोबत जत्रेत फिरत होता, रंगेहाथ पकडलं आणि पुढे जो राडा झाला, तो तुम्ही बघतच आहात… https://t.co/Fe0mgnV4dC
— Siddhesh Sawant (@ssidsawant) November 29, 2022
दरम्यान, ज्या मुलींमध्ये हा राडा झाला, त्या नेमक्या कुठल्या आहेत, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
सोनपुर मेले में बॉयफ्रेंड के चक्कर में 5 लड़कियों के बीच जमकर चले लात घुस्से#sonpurmela#Bihar pic.twitter.com/bTeliI6uPv
— vidya sagar (@journalistvidya) November 28, 2022
व्हायरल व्हिडीओमध्ये, ज्या तरुणीला मारहाण करण्यात आली, ती चोप देणाऱ्या पाचपैकी एका तरुणीच्या प्रियकराला स्वतःचा प्रियकर बनवून जत्रेत फिरवत होती, असंही सांगितलं जातंय. त्यावरुन या राड्याला सुरुवात झाली. अखेर या राड्यावेळी एका ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेचा व्हिडीओ आता चर्चेत आला आहे.