भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 12 जणांचा मृत्यू, तर 6 जखमी

भरधाव ट्रकचा कहर! चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अनर्थ घडला

भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 12 जणांचा मृत्यू, तर 6 जखमी
बिहारमध्ये भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 9:03 AM

बिहार : पुणे येथील नवले पुलावर रविवारी भीषण अपघात (Pune Navle Bridge Accident) घडला. या अपघातात एका ट्रकने तब्बल 40 पेक्षा जास्त वाहनांना जबर धडक दिली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण गाड्यांचं मोठं नुकसान झालं. तर 10 जण जखमी झाले. तर दुसरीकडे असाच एक भीषण अपघातात बिहारमध्ये (Bihar Accident News) झाला. या अपघातात तब्बल 12 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात बिहारच्या वैशाली (Vaishali) येथे रविवारी रात्री घडला. अनियंत्रित झालेल्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेने चालत होते. त्यावेळी हा अनर्थ घडला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तर 6 जण जखमी झालेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले. अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेला सर्व लोक हे लग्न सभारंभावरुन परतत होते. लग्नाचं जेवण जेवून झाल्यावर परतत असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातानं लग्न घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

ही घटना महनार-हाजीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घढली. सुलतानपूर 28 टोला येथून लोकं लग्नाचं जेवण जेऊन परतत होते. त्यावेळी एक भरधाव ट्रक समोरुन आला आणि त्याने लोकांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. यावेळी लोकांनी केलेला मदतीसाठीचा आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता.

भीषण अपघातात 8 जणांचा जागीच जीव गेला. तर कित्येक जण जखमी झाले. मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताक्षणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ट्रकखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

या अपघातप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलंय. तर मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलंय.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.