तुटलेला डावा हात उजव्यात हातात, रक्तांचे शिंतोडे रस्त्यावर,घाबरलेल्या लोकांनी पोलिसांना खबर दिली
crime news : सध्या एक क्राईमची अशी घटना घडली आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अर्धा तुटलेला हात हातात घेऊन तरुण रस्त्यात फिरत होता.
बिहार : बिहार (bihar) राज्यातील भागरपूर (bhagarpur) जिल्ह्यातील एक भयानक प्रकरण सध्या उजेडात आलं आहे. एक तरुण त्याचा डावा तुटलेला हात उचव्या हातात घेऊन फिरत आहे. त्यावेळी त्याच्या हातातून रक्त पडत होते. त्या युवकाला पाहून अनेकांना घाम फुटला होता. त्या तरुणाला कसल्याची प्रकारची भीती नव्हती. तो बिनधास्त रस्त्याने फिरत होता. त्या तरुणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल झाला आहे. हे प्रकरण रविवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
ज्यावेळी हा तरुण रस्त्याने फिरत होता, त्यावेळी घाबरलेल्या लोकांनी याची कल्पना पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तिथून त्याला जवाहर लाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात घेऊन जावे लागले.
तो तरुण बांका जिल्ह्यातील आहे, फुल्लीडुमर येथील कैथा गावातील राधे श्याम यादव यांचा तो मुलगा आहे. त्या मुलाचं नाव सुमन कुमार असं आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, रेल्वेच्या अपघातामध्ये त्याचा हात कापला आहे. कापलेला हात तो घेऊन सगळीकडं फिरत होता. काही लोकांचं म्हणणं आहे, तो अल्पबु्ध्दीचा आहे.
ज्यावेळी तो पोलिसांच्या ताब्यात आला, त्यावेळी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी थो़डासा जरी उशीर केला असता, तर त्या तरुणाचा मृत्यू झाला असता. कारण त्याच्या शरीरातून अधिक रक्तस्त्राव झाला होता. त्याचबरोबर पोलिसांनी त्याच्या जवळच्या नातेवाईकांना ही सगळी माहिती दिली आहे.
तो तरुण नातेवाईकाच्या अंतिम कार्यक्रमासाठी गेला होता. प्रवास करीत असताना त्याचा हात तुटला, तो तुटलेला हात घेऊन अनेक ठिकाणी फिरत होता. सध्या त्याची तब्येत ठीक असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.