Delhi CCTV | ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या दोघांना अडवलं, भररस्त्यात लुटीचा थरार

मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघा तरुणांना दोन दुचाकीस्वारांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दिल्लीत यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जवळ असलेल्या विवेक विहार परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.

Delhi CCTV | 'मॉर्निंग वॉक'ला निघालेल्या दोघांना अडवलं, भररस्त्यात लुटीचा थरार
दिल्लीत दोघांची लूटImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 7:51 AM

नवी दिल्ली : भल्या पहाटे ‘मॉर्निंग वॉक’ला जाण्याची अनेक जणांना सवय असते. आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी ही सकाळची फेरी दोघा जणांसाठी मात्र जीवघेणी ठरु शकली असती. ती कायमस्वरुपी लक्षात राहणारी तर निश्चितच ठरणार आहे. दिल्लीमध्ये (Delhi Crime) बंदुकीच्या धाकाने दोघा जणांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जवळ असलेल्या विवेक विहार परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. बाईकवर आलेल्या दोघा जणांनी मॉर्निंग वॉकवर निघालेल्या दोघा पादचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून थांबवले. त्यानंतर त्याच्याकडून मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज लुटल्याचा (Loot) आरोप आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं वृत्त ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघा तरुणांना दोन दुचाकीस्वारांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाणारी दोन माणसं पाहून लुटारुंनी रस्त्याच्या कडेला बाईक थांबवली. त्यानंतर हल्लेखोरांनी बंदूक काढून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन लुटून नेले.

रविवारी सकाळी विवेक विहार परिसरात ही घटना उघडकीस आली. अनेक पादचाऱ्यांनी लूट होताना पाहिली, परंतु त्यापैकी कोणीही चोरांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे दिसते. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे, असं वृत्त ‘एएनआय’ने दिलं आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

 तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी आठ लाखांची चोरी, मुंबईत 28 वर्षीय कार ड्रायव्हरला अटक

पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण, 50 हजारांची लूट, बेसबॉल बॅटने कार फोडली

तुमच्या हॉटेलमध्ये जेवून आजारी पडले, महिलेचा बनाव, प्रियकराच्या साथीने हॉटेल चालकाकडे खंडणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.