रस्त्यात बाईकवरती स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात, व्हिडीओ झाला होता व्हायरल
मुंबईच्या रस्त्यात बाईकचा स्टंट केल्यानंतर तरुणाचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला होता. पुढे आणि पाठी तरुणीला बसवल्यामुळे अधिक व्हायरल झाला होता.
मुंबई : बाईकवरती (bike) पुढे आणि पाठी मुली बसवून गाडीवरती स्टंट (stunt) करणाऱ्या तरुणाला मुंबईत बीकेसी (bkc police) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या मुलाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस तो व्हिडीओ कोणत्या परिसरातला आहे, याचा शोध घेत होते. त्या तरुणींना सुध्दा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे. हा स्टंट तरुणाने बीकेसीच्या रस्त्यावर केला आहे.
#WATCH मुंबई पुलिस ने फैयाज कादरी नाम के एक शख्स को गिरफ्तार किया है, जिसका बाइक स्टंट उसके दोपहिया वाहन पर बैठी दो महिलाओं के साथ वायरल हुआ था। आरोपी को BKC पुलिस ने गिरफ्तार किया। घटना BKC पुलिस अधिकार क्षेत्र में हुई थी: मुंबई पुलिस
हे सुद्धा वाचा(वायरल वीडियो की पुलिस ने पुष्टि की है) pic.twitter.com/UIP1tMi4gG
— ANI_HindiNews (@AHindinews) April 2, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजचे तरुण काहीही करतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण आणि तरुणी स्टंट करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका महागड्या बाईकवरती एक तरुणाने एका तरुणीला पुढे बसवले आहे, तर एका तरुणीला मागे बसवले आहे. गाडीचा पुढचा टायर वरती करुन गाडी चालवत असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. त्याचबरोबर तिघेही जोराचा आवाज करीत आहेत. त्यांचा हा स्टंट मोबाईलमध्ये एकाने शूट केला आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी फैयाज कादरी या नावाच्या तरुणाला अटक केली आहे. बीकेसी पोलिसांनी त्याची बाईक सुध्दा ताब्यात घेतली आहे. तरुणावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.