ट्रकने बाईकस्वाराला चिरडलं, अपघात नव्हे तर हत्याच.. पोलिसही हैराण
पुण्यातील जुन्नर तालुक्यातून एक हादरवणारी घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीस्वाराल चिरडलं, त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र हा कोणताही अपघात नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून ही हत्या करण्यात आली असा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला
पुण्यातील जुन्नर तालुक्यातून एक हादरवणारी घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीस्वाराल चिरडलं, त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र हा कोणताही अपघात नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून ही हत्या करण्यात आली असा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र या हत्येला अपघात दाखवण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव शाबिर कुरेशी असे आहे. या प्रकरणामुळेएकच खळबळ माजली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. संशयित आरोपी अभिजित सोनवने याला नारायणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गाजवळ ही धक्कादायक घटना घडली. शाबिर कुरेशी हा तरूण त्याच्या दुचाकीवर बसलेला असतानाच मागून भरधाव वेगाने एक ट्रक आला आणि त्याने शाबिरच्या बाईकला धडक देत त्याला चाकाखाली चिरडलं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शाबिरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीय शोकाकुल झाले असून हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर शाबिर कुरेशी हा त्याच्या दुचाकीवर बसलेला होता. तेव्हा पाठीमागून एक कार भारधाव वेगाने आली. अन् या भरधाव वेगातील कारने त्याला जागीच चिरडले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला. हा सर्व थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे. ही घटना बघताना अपघात झाला असल्याचं दिसत आहे. मात्र हा अपघात नसून सुनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचा आरोप शाबिरच्या कुटुंबियांनी केला. अनैतिक संबंधांच्या रागातून ही हत्या झाली असा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी संशयित आरोपी भिजित सोनवने याला नारायणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले असून ते अधिक तपास करत आहेत.