Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rape Case | बलात्काराचा आरोप झालेले NCPचे मेहबुब शेख कोण?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक आणि शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आज भाजपकडून तीव्र निदर्शनं केली जाणार आहेत.

Rape Case | बलात्काराचा आरोप झालेले NCPचे मेहबुब शेख कोण?
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 8:19 AM

औरंगाबाद: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आरोपीला तात्काळ अटक आणि शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आज भाजपकडून तीव्र निदर्शनं केली जाणार आहेत. भाजप महिला आघाडीकडून साडे अकरा वाजता क्रांती चौकात तर भाजयुमोकडून 4वाजता निदर्शनं करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडूनही पोलिस महासंचालकांना निवेदन दिलं जाणार आहे. (BJP aggressive against NCP’s Mehboob Sheikh who is accused of rape)

मेहबुब शेख कोण आहेत?

मेहबुब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत

मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार इथले रहिवासी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर परिचय

‘तो’ मी नव्हेच!

बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला मेहबुब इब्राहिम शेख आपण नाही, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केला आहे. फिर्याद दिलेल्या महिलेने 14 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील रामगिरी हॉटेलनजिकच्या एका महाविद्यालयाजवळील निर्मनुष्य जागेवर कारमध्ये आपल्यावर मेहबुब इब्राहिम याने कारमध्ये आपल्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरुन सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या मेहबुब शेख यांनी गावात या नावाचा माझ्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती नाही. मग जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, तो मेहबुब शेख कोण? असा सवाल पोलिसांनाच विचारला आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन यामागील खरा सूत्रधार पोलिसांनी शोधावा, असंही शेख यांनी म्हटलंय. फिर्यादीत फक्त नावाचा उल्लेख असल्यामुळे नेमका मेहबुब इब्राहिम शेख कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? हा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे. ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कँम्पेन राबवण्यात येत आहे. पीडिते आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही? चित्रा वाघ कडाडल्या

रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करा, कार्यकर्त्यांचं शरद पवारांना पत्र

BJP aggressive against NCP’s Mehboob Sheikh who is accused of rape