कल्याणमध्ये भाजप महिला अध्यक्षाने महिलांना लावला कोट्यवधींचा चुना; पोलिसांकडून गुन्हा दाखल

रेखा जाधव यांनी काही महिलांना 18 महिन्यात पैसे दामदुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले होते. | BJP leader arrested

कल्याणमध्ये भाजप महिला अध्यक्षाने महिलांना लावला कोट्यवधींचा चुना; पोलिसांकडून गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 3:11 PM

कल्याण: भाजपच्या कल्याणमधील महिला अध्यक्ष रेखा जाधव यांना पोलिसांनी आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. रेखा जाधव यांच्यासह चार जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP leader arrested in Kalyan for financial fraud)

कल्याणच्या गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या चंद्रप्रभा ढगले या महिलेच्या तक्रारीवरुन कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याणमध्ये राहणारा श्रीकांत राव,संदीप सानप, रेखा जाधव आणि सुनिल आव्हाढ या चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांवर आरोप आहे की, त्यांनी संगनमत करुन काही महिलांकडून एक कोटी 70 लाख रुपये घेतले. 18 महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून हे पैसे घेतले गेले. कोणाला कडून २० लाख, ३० लाख रुपये असे करुन एक कोटी 70 लाख रुपये घेतले गेले आहेत. या चौघां विरोधात काही महिन्यापासून तक्रार देण्यात आली होती. मात्र पोलिस तपास करीत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकाल लवांडे यांचा पुढाकाराने अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विकास लवांडे यांचे म्हणणे आहे की, पाच वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबीत होते. हे प्रकरण माझाकडे आले. गृहमंत्र्याकडे या प्रकरणी पाठपुरावा केल्यावर गृहमंत्र्यांच्या आदेशापश्चात हा गुन्हा दाखल झाला आहे. गोरगरीबां महिलांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस योग्य रितीने तपास करीत असा विश्वास आहे. ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी पुढे यावे. भारतीय जनता पार्टीने लूट करणारे कार्यकर्ते समाजात फेरले असतील तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

श्रीकांत राव यांनी पैसे दुप्पट करण्याच्या आमिष दाखवून पैसे घेतले. जेव्हा कधी महिला पैसे मागाचे. पोलिस ठाण्यात जाण्याचे धमकी द्यायचे रेखा जाधव त्यांची समजूत काढून त्यांना थांबवायची. ही मोडस ऑपरेंडी असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या:

Black magic against Minister : एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा, मोठं राजकीय षडयंत्र?

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर मॉडेलचा बलात्कार केल्याचा आरोप, महिला आयोगाचं महाराष्ट्र पोलिसांना पत्र

खून नवी मुंबईत, आरोपी बांगलादेशात, तरीही मुसक्या आवळल्या, कशा?

(BJP leader arrested in Kalyan for financial fraud)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.