Chitra Wagh | चित्रा वाघ फोटो मॉर्फ प्रकरण, यवतमाळमधून एकाला अटक
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याविरोधात सोशल मीडियावर (Chitra Wagh Photo Morph Case One Arrested) अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या होत्या.
यवतमाळ : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याविरोधात सोशल मीडियावर (Chitra Wagh Photo Morph Case One Arrested) अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. अश्लील पोस्ट टाकल्या प्रकरणी आणि फोनवर धमकविल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 2 जणांविरुद्ध मुंबई क्राईम ब्रान्चने गुन्हा दाखल केला आहे (Chitra Wagh Photo Morph Case One Arrested By Mumbai Crime Branch In Yawatmal).
मुंबई क्राईम ब्रान्चने यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राहुल तुळशीराम आडे राहणार जरंग याला अटक केली आहे. तर, संतोष राठोड हा अद्याप फरार आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांन्चच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
चित्रा वाघांना धमकीचे फोन
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर गेल्या बुधवारी (3 मार्च) पुन्हा एकदा त्यांनी काही ट्वीट केले आहेत. त्यातून त्यांना पुन्हा काही धमकीचे फोन आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्कार्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का ??? FIR होऊनही परीस्थितीत फरक पडला नाही @MumbaiPolice @MahaPolice
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 3, 2021
“दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का ??? FIR होऊनही परीस्थितीत फरक पडला नाही”, असं ट्वीट वाघ यांनी बुधवारी रात्री 9 च्या सुमारास केलं आहे. या ट्वीटवरुन त्यांना पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मला आठवतंय मागे माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर टॉयलेट मध्ये तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेन मध्ये लिहीलेला त्यावेळी त्यांना काय व कसे फोन करून त्रास दिला गेला ज्याची मी साक्षीदार आहे लढलेलो तेव्हाही
त्यांचा लढा सुद्धा प्रस्थापितां विरोधात होता
लडेंगे..जितेंगे.?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 3, 2021
चित्रा वाघांना यापूर्वीही धमकी
यापूर्वीही चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आले होते. त्यावेळीही त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. इतकंच नाही तर धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. “राजसत्तेकडे प्रचंड ताकद असते. सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत”, असं चित्रा वाघ ट्विटरवर म्हणाल्या (Chitra Wagh Photo Morph Case One Arrested By Mumbai Crime Branch In Yawatmal).
राज्यसत्तेकडे प्रचंड ताकद असते सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत (१/२)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
Chitra Wagh Photo Morph Case One Arrested By Mumbai Crime Branch In Yawatmal
संबंधित बातम्या :
चित्रा वाघ यांना पुन्हा धमकीचे फोन? लढा सुरुच राहणार असल्याचं ट्वीट