Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime | बीडमध्ये भाजप नेत्याच्या शिपायाला लुटले, जीवे मारण्याची धमकी; चोरट्यांचा शोध सुरु

भाजप नेते अक्षय मुंदडा (Akshay Mundada) यांच्या शिपायासोबत हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी शिपायाच्या गळ्यातील लॉकेट आणि रक्कम काढून घेतली. तसेच लूटमार करताना चोरट्यांनी अक्षय मुंदडा यांच्या शिपायाला जीवे मारण्याची धमकी दिली.

Beed Crime | बीडमध्ये भाजप नेत्याच्या शिपायाला लुटले, जीवे मारण्याची धमकी; चोरट्यांचा शोध सुरु
बदलापूरमध्ये ज्वेलर्स व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरी
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 11:34 AM

बीड : बीड जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. यावेळी चोरट्यांनी (Thief) चक्क एका भाजप नेत्याच्या शिपायालाच लुटले आहे. भाजप नेते अक्षय मुंदडा (Akshay Mundada) यांच्या शिपायासोबत हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी शिपायाच्या गळ्यातील लॉकेट आणि रक्कम काढून घेतली. तसेच लूटमार करताना चोरट्यांनी अक्षय मुंदडा यांच्या शिपायाला जीवे मारण्याची धमकी दिली. या लुटीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका राजकीय नेत्याच्या कर्मचाऱ्याला चोरटे लुटू शकतात मग सामान्य नागरिकांचे काय ? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय मुंदडा हे भाजप (BJP) आमदार नमिता मुंदडा यांचे पती आहेत.

रात्रीच्या अंधारात शिपायाला लुटले

मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील अंबाजोगाई येथे भाजप नेते अक्षय मुंदडा यांच्या शिपायाला चोरांनी लुटले आहे. त्यांच्याकडून चोरट्यांनी लॉकेट आणि रोख रक्कम लुटली. हा प्रकार समोर येताच चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत एकूण सहा जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लूटमार करताना चोरट्यांनी शिपायाच्या गळ्याला चाकू लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अंबाजोगाईच्या रसवंती गृहासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणात एकाला अटक केलं असून पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.

प्रेमी युगुलाने घेतला गळफास, तरुणाचा मृत्यू

दरम्यान, बीडमध्ये हादरवून टाकणारी आणखी एक मोठी घटना घडली. येथे प्रेमी युगुलांनी गळफास घेत 20 जानेवारी रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील भेंड गावामध्ये घडली. या घटनेमध्ये 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची प्रेयसी महिला फासाचा दोर तुटल्याने बचावली. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयपाल वाव्हळ असे मयत तरुणाचे नाव आहे.

इतर बातम्या :

औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप!

Nagpur Crime | दिवसा शंकरपट रात्री ‘हंगामा’, सर्जा राजाच्या नावाखाली नागपुरात विवस्त्र महिलांचा डान्स

Crime | ‘किडनी विक मालामाल होशील,’ नेपाळी गायिकेचा वॉचमनच्या बायकोला गंडा, 8 लाख रुपयांना फसवले

राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.