BJP MLA Jayakumar Gore:मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केल्याचे प्रकरण; भाजपा आमदार जयकुमार गोरेंचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला

वडूज, मुंबई नंतर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावूनही गोरे यांना दिलासा मिळालेला नाही. मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे , महेश पोपट बोराटे यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP MLA Jayakumar Gore:मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केल्याचे प्रकरण; भाजपा आमदार जयकुमार गोरेंचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला
जयकुमार गोरेंकडून मृत मागासवर्गीय व्यक्तीची जमीन लाटण्याचा प्रयत्नImage Credit source: फेसबुक
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 9:53 PM

दिल्ली : मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केल्याचे प्रकरण भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या(BJP MLA Jaykumar Gore) चांगलेच अंगाशी आले. या प्रकरणी गोरेंविरोधात गुन्हा दाखल (FIR) आहे. अटकपूर्व जामीनासाठी गोरे यांची धावाधाव सुरु आहेत. अशातच आता सुप्रीम कोर्टानेही(Supreme Court) त्यांना झटका दिला आहे. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. कोर्टासमोर येऊन रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने गोरे यांना दिले आहेत. यापूर्वी गोरे यांना वडूज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई हायकोर्टात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मात्र त्यांना कुठेच दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात दाद मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

वडूज, मुंबई नंतर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावूनही गोरे यांना दिलासा मिळालेला नाही. मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे , महेश पोपट बोराटे यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने का फेटाळला गोरेंचा जामीन अर्ज

साताऱ्यातील वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र कुठेच दिलासा न मिळाल्यानं जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे गोरेंची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सत्र न्यायालयात शरण जाऊत रितसर जामीन घेण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण

खटाव तालुक्यातील मायणी येथील मातंग संमाजाचे मृत पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप गोरेंवर आहे. या प्रकरणी जयकुमार गोरे,दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे, महेश पोपट बोराटे आणि अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये महादेव भिसे यांनी तक्रार करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीसांनी संजय काटकरला अटक केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.