Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्या बाबा लोकांचा नाद… नको रे बाबा! कधी विष तर कधी रेप, बंगाली बाबांची काळी कृत्य अधोरेखित करणाऱ्या 5 हादरवणाऱ्या घटना

Black Magic : बंगाली बाबांच्या नादाला लागून अंगावर काटा आणणारी कृत्य उघडकीस आली आहेत.

ह्या बाबा लोकांचा नाद... नको रे बाबा! कधी विष तर कधी रेप, बंगाली बाबांची काळी कृत्य अधोरेखित करणाऱ्या 5 हादरवणाऱ्या घटना
बंगाली बाबांच्या हादरवणाऱ्या कहाण्या...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 3:08 PM

तुम्हाला दगडू आठवतोय का? दगडू परब.. आपल्या टाईमपास सिनेमातला. त्याचा एक हिट डायलॉग होता. ‘आई बाबा आणि साई बाबांची शपथ’ घेणाऱ्या दगडूचा डायलॉग प्रचंड गाजला. जमाना इतका पुढे गेलाय, टेक्नॉलॉजी (Technology News) रोज आपलं टँलेंट दाखवतेय, पण यातही बंगाली बाबा अजूनही गाजवतायत. आजुबाजूला बंगाली बाबांची काही कमी नाय. लोकलमधल्या जाहिराती असो, नाही तर गल्लोगल्ली केल्या जाणाऱ्या चर्चा… बंगाली बाबांचे रोज नवनवे किस्से समोर येतायत. गेल्या काही दिवसांत तर हद्दच झालीये. बंगाली बाबांच्या नादाला लागून अंगावर काटा आणणारी कृत्य उघडकीस आली आहेत. या कृत्यांनी संपूर्ण देश हादरलाय. या घटना आठवण्यामागचं कारण आहे, नाशिकमधील हादरवणारी बातमी. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात एका अफगाणिस्तानातून (Afghanistan) आलेल्या स्वतःला सुफी बाबा म्हणणाऱ्या एका मुस्लिम मांत्रिकाची गोळ्या घालून हत्या (Black Magic Murder) करण्यात आली. या घटनेनं बंगाली बाबांचं भूत लोकांच्या मनातून कधी उतरणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.

नाशिक :

नाशिकच्या येवला तालुक्यात अफगणिस्तानातून आलेल्या आणि येवल्यात रेफ्युजी म्हणून राहत असलेल्या एका मुस्लिम मांत्रिकाचा खून करण्यात आला. थेट कपाळावर निशाणा लावत या मुस्लिम मांत्रिकाच्या डोक्यातून गोळी आरपार करण्यात आली. तिघांनी मिळून हे हत्याकांड केल्याचा संशय आहे. कसली तरी पुजा झाल्यानंतरच हे हत्याकांड करण्यात आलं, असाही संशय व्यक्त करण्यात आलाय. तर दुसरीकडे प्रॉपर्टी आणि आर्थिक उलाढालींमधून मांत्रिकाच्या ड्रायव्हरनेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेनं नाशिक जिल्हा हादरुन गेलाय.

सांगली :

सांगलीत नुकतीच एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पण ही आत्महत्या नसून हत्या आहे, हे नंतर उघकीस आलं. धक्कादायक बाब म्हणजे एका मुस्लिम बाबानेच 9 जणांना चहातून विष देत मारुन टाकलं होतं. या बाबा कोट्यवधी रुपये येतील, अशा भूलथापा या कुटुंबाकडून पैसे उकळत होता. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा उलगडा करत हे कृत्य उघडकीस आणलं. होतं. नेमकी ही घटना काय होती? वाचा सविस्तर – इथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

हैदराबाद :

काळ्या जादूच्या नावाखाली महिलेचा रेप करणाऱ्या बाबाला 26 नोव्हेंबर 2021 ला अटक करण्यात आली होती. या बाबाचं नाव होतं सईद हनस अकसारी. या बाबासोबत त्याचा मुलगाही बलात्कारी निघाला होता. दोघांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. एका महिलेवर 10 वर्ष या बाबाने बलात्कार केला. नंतर तिच्या मुलीवही त्यानं बलात्कार केला. त्यानंतर या महिलेला आपण फसवले गेलो आहोत आणि आपल्यासोबत भयंकर प्रकार झालाय, याची जाणीव झाली. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं.

यवतमाळ :

11 जून 2022 लाही अशीच एक घटना समोर आली. अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याच्या मोहात एका पुरुषाने चक्क स्वतःच्या पत्नीवरच मांत्रिक प्रयोग केले. पत्नीला अंगारा लावणे, लिंबू, हार टाकणे, माणसाची कवटी तिच्या गळ्यात टाकणे असे भयंकर अघोरी केले गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न पतीने केला होता. यवतमाळच्या केळापूर इथं हा संतापजनक प्रकार घडलेला. वाचा संपूर्ण घटना

हरियाणा :

घटना 22 डिसेंबरची! मोक्षप्राप्तीच्या नादापायी एकानं तर आपल्या पोटच्या पोरांची, बायकोची हत्या केली. आपल्या कुटुंबातल्या लोकांचे गळे लोखंडी रॉडने चिरले. त्यानंतर सुसाईड नोट लिहिली आणि मग एका गाडीखाली येऊन स्वतःही जीव दिला. या भयंकर घटनेनंत सगळेच हादरले होते. संन्यासी बाबा होण्याच्या मार्गावर असलेल्या या इसमाचं नाव होतं रमेश. त्यानं लिहिलेली 11 पानी सुसाईड नोट वाचून पोलिसही चक्रावून गेले होते. नेमकी ही घटना काय? वाचा सविस्तर इथे क्लिक करा.

गुप्तधनाची लालसा, मोक्षप्राप्तीचा नाद, बाबा बंगाली लोकांचं वेड, पैशांचा पाऊस पाडण्याचं सांगणं, एका पेक्षा एक विचित्र गोष्टी सांगून लोकांना गांगरवून सोडणं, असले प्रकार आजही सुरुच आहेत. वर सांगितलेल्या पाच घटना हेच अधोरेखित करतात. या आणि अशा अनेक घटना दररोज आपल्या आजुबाजूला घडताना दिसताय. आजच्या विज्ञान युगातही असले बंगाली बाबांचा कहर सुरुच आहेत. त्यामुळे या असल्या बाबा लोकांचा नाद… नको रे बाबा! म्हणणंच, योग्य ठरेल!

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.