आयुष्यात असं काही घडलं की त्याला महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला, माणूस… ते ब्लेडमॅनपर्यंतचा प्रवास ऐकून पोलीसही चक्रावले !

एकामागोमाग एक महिला आणि तरुणींवर ब्लेडने हल्ले होत होते. या हल्ल्यांमुळे पोलिसांची पुरती झोप उडाली होती. अखेर 300 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर जे उघड झाले ते ऐकून पोलिसही चक्रावले.

आयुष्यात असं काही घडलं की त्याला महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला, माणूस... ते ब्लेडमॅनपर्यंतचा प्रवास ऐकून पोलीसही चक्रावले !
डीआरआयकडून डायमंड कंपनीचा संचालक अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 4:18 PM

बरेली : तो यायचा आणि तरुणींवर ब्लेडने वार करुन पसार व्हायचा. एकामागोमाग घडलेल्या या घटनांमुळे बरेली पोलिसांची झोपच उडाली होती. अखेर 300 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अखेर पोलीस आरोपीला पकडण्यास यश आले आहे. आरोपी केवळ नोकरदार महिलांनाच आपले टार्गेट करत होते. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत त्याने जो खुलासा केला ते ऐकून पोलीसही हैराण झाले. बरेलीतील किल्ला पोलीस ठाणे आणि प्रेम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून ‘ब्लेडमॅन’ने दहशत पसरवली होती. एकसारख्या पद्धतीच्या हल्ल्याची प्रकरणे वारंवार घडत होती. या सर्व घटनांमध्ये नोकरदार महिलांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर ब्लेडने वार करण्यात आले होते. हल्लेखोर दुचाकीवरून आल्याचे पीडितांनी सांगितले होते.

पोलिसांनी आरोपी शोध सुरु केला. यासाठी परिसरातील सुमारे 300 सीसीटीव्ही तपासले. अखेर पोलिसांना आरोपीचा थांगपत्ता लागला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सज्जाद असे आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

काय आहे प्रकरण?

सज्जादचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. मात्र नंतर सज्जाद फरा नावाच्या नोकरदार तरुणीच्या प्रेमात पडला. मग पत्नीला सोडून त्याने फराशी लग्नही केले. लग्नानंतर काही दिवसांनी फराने आरोपीविरोधात खोटी पोलीस तक्रार दाखल केली आणि त्याबदल्यात त्याच्याकडून 20 लाख रुपये लुटले. पैसे मिळाल्यानंतर फरा सज्जादला सोडून गेली. यानंतर सज्जादला महिलांविषयी द्वेष निर्माण झाला.

हे सुद्धा वाचा

फराने दाखल केलेल्या खोट्या केसमधून लवकरात लवकर त्याला सुटका करुन घ्यायची होती. यादरम्यान त्याची एका मौलानासी भेट झाली. सज्जादची खोट्या केसमधून सुटका होण्यासाठी मौलानाने त्याला तीन नोकरदार महिला किंवा तरुणींवर ब्लेड किंवा चाकूने हल्ला करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सज्जाद बाईकवरुन यायचा आणि महिलांवर हल्ला करायचा. पोलीस मौलानाचा शोध घेत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.