एका ब्ल्यू टुथ हेडफोनमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले, महिला डॉक्टरच्या निघृण हत्येचे गुढ असे उकलले

| Updated on: Aug 11, 2024 | 4:46 PM

पश्चिम बंगलच्या सर्व मेडिकल कॉलेजातील डॉक्टरांनी ज्युनियर डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. या घटनेमुळे विरोधकांनी तृणमूल कॉंग्रेसवर टिका केली आहे. भाजपाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

एका ब्ल्यू टुथ हेडफोनमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले, महिला डॉक्टरच्या निघृण हत्येचे गुढ असे उकलले
Follow us on

पश्चिम बंगालमध्ये एका ज्युनियर महिला डॉक्टरवरची निघृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार रुममध्ये शुक्रवारी सकाळी या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला. या महिला डॉक्टरच्या पालकांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केली आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. कोलकाता येथील वातावरण या हत्येने ढवळले असून या प्रकरणाची फास्ट ट्रॅक सुनावणी घेण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टर सोबत गुरुवारी रात्री भयंकर प्रकार घडला आहे. मृत झालेली तरुणी मेडिकल कॉलेजात छाती विकार विभागात मेडीकलच्या द्वितीय वर्षाला होती. ही घटना कोलकाता शहरातील वर्दळीच्या लालबाजार येथे घडली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजल्यानंतर ही महिला डॉक्टर ड्यूटीवर होती. तिने मित्रांसोबत डीनर देखील केला. त्यानंतर ती बेपत्ता झाली. शुक्रवारी सकाळी चौथ्या मजल्यावर सेमिनार हॉलमध्ये या अर्धनग्न अवस्थेत या महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. घटनास्थळावरुन तिचा मोबाईल आणि लॅपटॉप देखील मिळाला आहे.

लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट

पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालानूसार या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या तोंडातून दोन्ही डोळ्यांतून आणि गुप्तांगावर रक्ताचे डाग आणि चेहऱ्यावर नखांच्या जखमा आढळल्या आहेत. ओठ, मान, पोट, डाव्या घोटा,उजव्या हाताच्या बोटाला जखमा आढळल्या आहेत. या प्रकरणात मृत डॉक्टर महिलेच्या आईने आपल्या मुलीवर अत्याचार करुन तिला संपविल्याचे म्हटले आहे. ती अर्धनग्न अवस्थेत पडली होती.काचा तुटलेल्या होत्या. आत कोणताही सीसीटीव्ही नव्हता. सर्वकाही अस्थाव्यस्त पडले होते. घटनास्थळी सीसीटीव्ही नव्हते. घटनेवेळी तिच्या सोबत कोण होते याचा शोध पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली. परंतू कोणतेही धागेदोरे सापडत नव्हते. अखेर एका सिव्हिक वॉलिएंटरला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव संजय रॉय असे आहे. त्याच्या हालचाली तसेच इतर बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी सुरु केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याने संशय

पोलिसांनी सर्व रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यावेळी घटनेच्या रात्री अडीच वाजता आरोपी संजय रॉय कॉरिडॉरमध्ये घुटमळताना दिसला. त्याच्या सुरुवातीच्या जबानीत त्याने बदल केल्याने पोलिसांना संशय आला. त्याने आपण काही रुग्णांना दाखल केले होते त्यांच्या चौकशीसाठी आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आणखीन सीसीटीव्ही पाहीले तर दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो दिसला. संबंधित रुग्णांना विचारले असताना तो त्या दिवशी वॉर्डात फिरकला नसल्याचे पोलिसांना कळाले.काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याचे फुटेज दाखविले असताना त्यांनी हा सोशल वर्कर रुग्णांना दाखल करण्यासाठी नेहमीच येतो अशी माहिती मिळाली.

ब्ल्यु टुथ हेडफोनची वायर सापडली …

पोलिसांना एका ठिकाणी ब्ल्यू टुथ हेडफोनची तुटलेली वायर सापडली. सीसीटीव्ही पुन्हा चेक केले तर संजय रुग्णालयात आला तेव्हा त्याच्या गळ्यात ब्ल्यू टुथ हेडफोन होता.चौथ्या मजल्यावर पोलिसांना हा ब्ल्यू टुथ सापडला. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मात्र संजय रॉय याच्या गळ्यात ब्ल्युटुथ नसल्याचे उघड झाल्याने हा ब्ल्युटुथ त्याचाच असल्याचे पोलिसांना कळाले.