दारूच्या नशेत झाले भांडण, महिलेने केली रूममेटचीच हत्या; , पोलिसांना फोन करून दिलीकबुली

दिल्लीत एका घरात २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

दारूच्या नशेत झाले भांडण, महिलेने केली रूममेटचीच हत्या; , पोलिसांना फोन करून दिलीकबुली
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 12:50 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील एका अल्पवयीन मुलीची तरूणाने चाकूने वार करून निर्घृण हत्या (killed minor girl)  देशभरात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच दिल्लीत आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अरुणा नगर येथे एका घरात महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने खळबळ माजली आहे. राणी असे या मृत तरुणीचे नाव असून सपना या तिच्या फ्लॅटमधील मैत्रिणीनेच तिची हत्या (woman killed flatmate)  केल्याचेही समोर आले आहे. सपनानेच पोलिसांना फोन करून घरात राणीचा मृतदेह असल्याची माहिती दिली.

फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी सपनाची भेट घेतली. पोलिसांना राणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. एफएसएल आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, सतत केलेल्या चौकशीदरम्यान सपनाचा बांध फुटला आणि तिनेच गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी (वय ३५ वर्षे) आणि सपना (३६ वर्षे) या अरुणा नगर, मजनू का टिळा येथे भाड्याच्या ठिकाणी राहत होत्या. राणी गुडगावमधील ब्युटी पार्लरच्या दुकानात काम करायची आणि सपना पार्टीमध्ये वेटर अथवा डेकोरेटर म्हणून काम करते. सपना घटस्फोटित असून तिला एक मुलगी आहे.

हत्येच्या रात्री सपना आणि राणी यांनी इतर काही मित्रांसह अरुणा नगर (मजनू का टिल्ला) येथे दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत पार्टी केली. त्यावेळी सपना आणि राणी यांनी मद्यपान केले होते व त्यांच्यात थोडं भांडणही झालं. त्यानंतर सपना आणि राणी त्यांच्या भाड्याच्या खोलीत परत आल्या आणि दारू पिणे सुरूच ठेवले, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

घरी आल्यावर पहाटे साडेचार वाजता त्यांच्यात जोरदार भांडण झाले, ज्याचे पर्यवसन हाणामारीतही झाले. त्यावेळी राणीने सपनाच्या दिवंगत वडिलांना शिवीगाळ केल्याचे समजते. यामुळे भडकलेल्या सपनाने राणीच्या छातीवर स्वयंपाकघरातील चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या राणीचा तत्काळ मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सपनाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.