Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Murder : वसईत अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला, धारदार हत्याराने वार करुन हत्या

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरुन जात असताना एका नागरिकाला एक संशयास्पद बॅग दिसली. या बॅगेतून वास येत असल्याने त्याला संशय आला. त्याने तात्काळ वालीव पोलिसांना याची माहिती दिली.

Vasai Murder : वसईत अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला, धारदार हत्याराने वार करुन हत्या
वसईत अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 7:53 PM

वसई : वसईत एका अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह (Deadbody) आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मयत मुलगी अंदाजे 16 ते 17 वर्षांची असून, तिच्या पोटात धारदार हत्याराने वार करुन हत्या (Murder) करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पिशवीत भरुन रस्त्याच्या कडेला झाडाझुडुपात फेकण्यात आला होता. रस्त्यावरुन जात असलेल्या एका नागरिकाला वास आल्याने त्याने ही माहिती वालीव पोलिसां (Waliv Police)ना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. मयत मुलगी अंधेरी परिसरातील असल्याची माहिती मिळत असून पोलीस त्याआधारे शोध घेत आहेत.

एका नागरिकाने संशयास्पद बॅग पाहिल्यानंतर घटना उघडकीस

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरुन जात असताना एका नागरिकाला एक संशयास्पद बॅग दिसली. या बॅगेतून वास येत असल्याने त्याला संशय आला. त्याने तात्काळ वालीव पोलिसांना याची माहिती दिली. वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले असता बॅगेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तरुणीच्या पोटावर धारदार हत्याराने वार करून अक्षरशः तिचा कोथळा बाहेर काढण्यात आला आहे. मृतेदह एका चादरीत बांधून बॅगेत भरुन रस्त्याच्या कडेला ही बॅग टाकून आरोपी फरार झाले.

मयत मुलगी अंधेरी परिसरातील रहिवासी

वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मयत मुलगी अंधेरी परिसरातील रहिवासी असून, अंधेरीतील एका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रारही नोंद आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केले असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी सांगितले. मुलीची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली हे आरोपींच्या अटकेनंतरच उघड होईल. (Body of minor girl found in Vasai, stabbed to death with a sharp weapon)

हे सुद्धा वाचा

मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?.
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ.
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.